Mumbai Local Train Updates : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण, लोकल ट्रेनची सद्यस्थिती काय? वाचा सविस्तर...

Mumbai Local Latest Update Due To Heavy Rain: मुंबईत मुसळधार पावसामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली होती. सध्या लोकलची काय स्थिती आहे, ते पाहू या.
लोकल ट्रेन
Mumbai Local TrainSaam Tv

रूपाली बडवे, साम टीव्ही मुंबई

मुंबईमध्ये सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. या जोरदार पावसामुळे शहराची लाईफलाईन असलेली लोकलसेवा विस्कळीत झाल्याचं समोर आलं होतं. दादर स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या दादर स्थानकात थांबुन होत्या. तर सीएसटी स्थानकात फलाट रिकामे नसल्याने एक्स्प्रेस गाड्या रूळावर रखडल्या होत्या. पण आज शहरात लोकलची काय स्थिती आहे?

लोकलची सद्यस्थिती काय आहे?

शहरात रात्रीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं पाहायलं (Mumbai Local) मिळालं. पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरील ट्रॅक पहाटे साडेचार वाजता कार्यान्वित करण्यात आला.मुख्य मार्गावरील जलद आणि धीम्या दोन्ही लोकल वेळापत्रकापेक्षा २ ते ३ मिनिटे उशिरा धावत आहेत. हार्बर मार्गावरील लोकल जवळपास वेळेवर धावत आहेत. अचानक काल पावसामुळे काही ठिकाणी लोकल रद्द तर काही ठिकाणी उशीरा धावत असल्यामुळे नागरिकांची मोठी धांदल उडाली होती.

मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता

सोमवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मध्यरात्रीपासून थोडी विश्रांती घेतली. त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्ग आणि रस्ते वाहतूक मार्ग देखील सुरळीत झाले आहेत. भारतीय हवामान खात्याने मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली (Mumbai Local Train Latest Update) आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या हेतुने आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलीय. तसेच यंत्रणेतील सज्ज राहण्याच्या सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत.

लोकल ट्रेन
Mumbai Local Train : ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कसारा-आसनगाव लोकलसेवा ठप्प

उपनगरातील रस्ते वाहतुकीसाठी खुले

उपनगरातील सखल भागात साचलेले पाणी ओसरले (Mumbai Rain) आहेत. त्यामुळे रस्ते देखील वाहतुकीसाठी खुले झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. हवामान खात्यांने मुंबईला पावसाच्या अनुषंगाने रेड अलर्ट दिला. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांना आजही अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे गरज असेल, तर घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं (Mumbai News) आहे.

लोकल ट्रेन
Mumbai Local Train: मुंबईत पावसाचा कहर! सीएसएमटी ते मानखुर्द हार्बर लोकल सेवा बंद; नागरिकांचे हाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com