Nashik Baglan Violence Saam Tv
महाराष्ट्र

क्षुल्लक कारणावरून वाद; माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला, नाशिकमध्ये चाललंय काय ?

Nashik Baglan Violence: नाशिकच्या बागलाणमध्ये माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला. क्षुल्लक वादातून घडला हल्ला. माजी सरपंच मुन्ना सूर्यवंशी रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल.

Bhagyashree Kamble

  • नाशिकच्या बागलाणमध्ये माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला.

  • क्षुल्लक वादातून घडला हल्ला.

  • माजी सरपंच मुन्ना सूर्यवंशी रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल.

  • परिसरात भीतीचे वातावरण, पोलिसांनी तपास सुरू केला.

नाशिकच्या बागलाण येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. क्षुल्लक वादातून त्यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात माजी सरपंच गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर गावातील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकमध्ये रवाना करण्यात आले आहे.

मुन्ना सूर्यवंशी असे माजी सरपंचाचे नाव आहे. ते नाशिकच्या बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील रस्त्याच्या कामासाठी लोकसहभागातून मुरूम टाकण्यात येत होते. मुरूम वाहतूक सुरू असताना, 'आम्हाला का विचारले नाही?' या कारणावरून वाद झाला.

या वादातून संतप्त झालेल्या एका व्यक्तीनं माजी सरपंच सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सूर्यवंशी गंभीर जखमी झाले असून, रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना तातडीने सटाणा ग्रामीम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकमध्ये रवाना करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच नाशिकमध्ये माजी सरपंचावर प्राणघातक झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे सटाणा येथे रास्ता रोको

नाशिकच्या सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, यामुळे वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतूक ठप्प होत असून, याचा फटका नागरिकांना बसत आहे. याच त्रासाला कंटाळून माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले. जो पर्यंत रस्त्याचे काम होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असं चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT