YEOLA ACID ATTACK: UNKNOWN PERSON THROWS ACID ON SLEEPING FARMER COUPLE IN NASHIK Saam Tv
महाराष्ट्र

Nashik : झोपलेल्या शेतकरी दांपत्यावर अ‍ॅसिड हल्ला; नाशिकमधील धक्कादायक घटना

Nashik Yeola Acid Attack News : नाशिक जिल्ह्यात शेतकरी दाम्पत्यावर झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने अ‍ॅसिड फेकले. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

Alisha Khedekar

  • येवला तालुक्यात झोपलेल्या दाम्पत्यावर ऍसिड हल्ला

  • भाऊसाहेब आणि कांता बोराडे गंभीर जखमी

  • आरोपीविरोधात गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू

  • घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवळाणे येथील बोराडे वस्तीवर अज्ञात व्यक्तीने झोपेत असलेल्या दाम्पत्यावर अ‍ॅसिड फेकल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी भाऊसाहेब बोराडे आणि त्यांच्या पत्नी कांता बोराडे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर येवला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण येवला तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब बोराडे आणि त्यांची पत्नी कांता बोराडे हे नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी घराच्या टेरेसवर झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावर अचानक अ‍ॅसिड फेकले. अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेत असलेल्या दाम्पत्याला तातडीने येवला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच नाशिकचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी तात्काळ रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. यावेळी मनमाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन आणि येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून पुढील तपास सुरू आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वैयक्तिक वाद की इतर कोणता हेतू होता याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना गणपती बाप्पा पावला! १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या मोबाईलवर SMS आला का?

ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव, 13 कोटी मतदार वगळल्याच्या चौकशीची मागणी

दुष्काळानं घेतला शेतकऱ्यांचा बळी, 24 तासांत राज्यातील 4 शेतकऱ्यांची आत्महत्या

अखेर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत कधी? विरोधकांचा सवाल

जरांगे रुग्णालयात अंतरवालीतला मंडप हटवला, 3 वर्षांनी मंडप हटवला, जरांगेंचा नवा 'बॉम्ब'!

SCROLL FOR NEXT