nashik Vani accident  Saam tv
महाराष्ट्र

सप्तशृंगी देवीच्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात पाच जण दगावल्याची शक्यता

nashik Vani accident : सप्तशृंगी मातेच्या भाविकांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण दगावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Vishal Gangurde

राज्यात अपघातांची मालिका

नाशिकच्या वणीत भाविकांच्या कारला अपघात

अपघतात ५ जण दगावल्याची शक्यता

अजय सोनवणे, साम टीव्ही

राज्यात अपघातांची मालिका सुरुच आहे. नाशिकच्या वणीत आज रविवारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. सप्तश्रृंगी गडावरून परतताना भाविकांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात ५ जण दगावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या सप्तशृंगी देवीच्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला. या भाविकांची कार थेट दरीत कोसळल्याची घटना घडली. गणपती पॉइंटजवळ अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. घाटाचा संरक्षण कथडा तोडून कार दरीत कोसळली.

दर्शन घेऊन परतताना अपघात घडला. या अपघातात कारमधील पाच जण दगावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून मदत कार्य सुरू सुरु आहे. दरी खोल असल्याने मदत कार्यात अडचण आल्याचे सांगण्यात येत आहे.

कारमध्ये किती माणसे होती?

मीडिया रिपोर्टनुसार, कारमध्ये एकूण ७ प्रवासी होते. त्यातील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. अपघातामधील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनाास्थळी धाव घेतली. यावेळी आपत्ती व्यवस्थापनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. घाटाच्या संरक्षक भिंतीचं काम अपूर्ण असल्याचे माहिती मिळत आहे. यामुळे अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. या स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT