उद्धव ठाकरे-काँग्रेसमधला दुरावा मिटणार? मनसेसोबतच्या युतीवर मोठा निर्णय? VIDEO

Maharashtra Political news : राज ठाकरेंसोबतच्या युतीवरून ठाकरेसेना आणि काँग्रेसमध्ये सुरु असणारा संघर्ष कमी होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.. याला कारण ठरलयं...काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी मातोश्रीवर घेतलेली ठाकरेंची भेट... या भेटीत नेमकं काय घडलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
maharashtra Politics
bmc election Saam tv
Published On

महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमध्ये युती होणार असल्याची चर्चा रंगली... आणि महाविकास आघाडीतील घटकपक्ष असणाऱ्या काँग्रेसनं मनसेला कडाडून विरोध करून एकला चलोचा नारा दिला...त्यात आता महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असणाऱ्या खासदार दिग्विजय सिंह यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतलीय... त्य़ामुळे या भेटीत राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जातेय.

खरंतर महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक एकत्र लढवली.. त्यामुळे मुंबईतील 6 पैकी 4 तर राज्यात 30 जागांवर विजय मिळवला... मात्र त्यानंतर महाविकास आघाडीत जागावाटपामध्ये जोरदार रस्सीखेच रंगलीय.. आणि त्याचाच फटका बसल्यानं महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला... आता हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आलेत.. त्यांची युती जवळपास निश्चित मानली जातेय... त्यामुळे उद्धव ठाकरे, पवारही युतीसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे...मात्र पवार आग्रही असतानाही काँग्रेसने राज ठाकरेंना विरोध का केलाय... पाहूयात...

maharashtra Politics
50 हजार फॉलोअर्स असलेली रिलस्टार निघाली चोर, बॉयफ्रेंडच्या मदतीने करायची महिलांच्या पर्स लंपास

राज ठाकरेंची आक्रमक हिंदुत्ववादी आणि मराठी भूमिका

मराठीच्या मुद्द्यावरुन मारहाणीमुळे उत्तर भारतीय मतं दुरावण्याची भीती

भोंग्याविरोधातील भूमिकेमुळे अल्पसंख्याक मतं दुरावण्याची शक्यता

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंसोबतच्या युतीला काँग्रेसनं विरोध केल्यामुळे ठाकरेसेना आणि काँग्रेसमधील दुरावा वाढत गेलाय..अशातच दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना मनसेसोबतच्या युतीबाबत काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा करणार असल्याचं सांगितलं होतं.

maharashtra Politics
कल्याण-डोंबिवलीकरांनो सावध राहा; ग्रामीण पट्ट्यात बिबट्याची एन्ट्री, नागरिक दहशतीत

त्यामुळे दिग्विजय सिंह यांच्या भेटीमागे कौटुबिक कारणं सांगितलं जात असलं तरी यामागे मनसेसोबतच्या युतीवरही चर्चा झाल्याची शक्यता आहे.. किंबहुना दिग्विजय सिंह ठाकरेंची भूमिका हायकमांडजवळ पोहचवू शकतात... त्यामुळे विधानसभेत सुफड़ा साफ झालेले मविआतील घटक पक्ष मनसेला सोबत घेऊन महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांची मोट बांधणार का? की मविआतील घटकपक्ष एकला चलो चा मार्ग निवडणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com