nashik political news  saam tv
महाराष्ट्र

९० लाखांच्या वसुलीसाठी तगादा, घरात घुसून शिवीगाळ; शिंदेंच्या कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न, माजी महापौरावर गुन्हा दाखल

Nashik Political Worker Suicide Attempt Due To Debt Harassment: नाशिकमध्ये 90 लाखांच्या वसुलीसाठी झालेल्या कथित त्रासामुळे शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Omkar Sonawane

नाशिक: माजी महापौर अशोक मूर्तडक यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी पदाधिकारी आणि मनपा निवडणुकीत शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या पंचवटीतील एका कार्यकर्त्याला मूर्तडक यांनी घरी जाऊन मारहाण तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यातून नैराश्य आल्याने शिंदेसेनेचा कार्यकर्ता योगेश बाळकृष्ण दाभाडे याने फिनेल पिल्याची खळबळजनक घटना घडली असून या प्रकरणी माजी महापौर मूर्तडक यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

फिनेल पिल्याने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात हलविल्याचे सूत्रांनी सांगितले. योगेश बाळकृष्ण दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी माजी महापौर अशोक मूर्तडक यांच्याकडून 90 लाख उसने घेतले होते. त्यातील काही रक्कम परत दिल्यानंतर उर्वरित पैशांसाठी मूर्तडक यांनी त्रास दिल्याचा आरोप आहे.

पैशांच्या वसूलीसाठी मूर्तडक यांनी दाभाडे यांना वारंवार धमकावले, तसेच त्यांच्या कुटुंबियांबाबतही अश्लील भाषेत शिवीगाळ करीत 13 मार्च रोजी त्यांनी दाभाडे यांच्या घरी जाऊन अपमानास्पद वर्तन करत गंभीर परिणामांची धमकी दिल्याचा आरोप आहे. दरम्यान 1 एप्रिल रोजी दाभाडे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल असताना मूर्तडक यांनी तेथेही जाऊन पैशांसाठी दमदाटी केल्याची तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर 15 एप्रिलला पुन्हा दाभाडे यांच्या घरी जाऊन वाद घालत मारहाण केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana Calculation: सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करा अन् ७१.८२ लाख मिळवा, कॅल्क्युलेशन वाचा

Maharashtra News Live Update: नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील निदा खानचा पती पोलिसांच्या ताब्यात

Bhooth Bangla Review: अक्षय कुमारचा 'भूत बंगला' थिएटरमध्ये पास की फेल; प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Nagpur : सुई टोचण्याची कटकट संपली, डायबिटीस तपासण्यासाठी बाजारात येणार नवीन डिवाईस; जाणून घ्या सविस्तर

Bigg Boss Marathi 6: जुने स्पर्धक येणार नवं टास्क घेऊन; बिग बॉस मराठी 6 मध्ये मेघा धाडे-पुष्कर जोग आणि शिव ठाकरेची एंट्री

SCROLL FOR NEXT