Nagpur : सुई टोचण्याची कटकट संपली, डायबिटीस तपासण्यासाठी बाजारात येणार नवीन डिवाईस; जाणून घ्या सविस्तर

Diabetes Innovative Device : नागपूरमध्ये श्वासातून शुगर तपासणारे नॉन-इनवेसिव्ह डिवाइस विकसित करण्यात आले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे डायबिटीस रुग्णांना सुईशिवाय शुगर तपासणी करता येणार आहे.
Nagpur : सुई टोचण्याची कटकट संपली, डायबिटीस तपासण्यासाठी बाजारात येणार नवीन डिवाईस; जाणून घ्या सविस्तर
Diabetes Innovative DeviceSaam Tv
Published On
Summary
  • नागपूरमध्ये श्वासातून शुगर तपासणारे डिवाइस विकसित

  • सुईशिवाय शुगर तपासणी शक्य

  • Acetone डिटेक्शनवर आधारित तंत्रज्ञान

  • टाईप 1 डायबिटीस रुग्णांसाठी उपयुक्त

  • लवकरच बाजारात येण्याची शक्यता

पराग ढोबळे, नागपूर

डायबिटीसच्या रुग्णांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता मधुमेह तपासण्यासाठी सुईची गरजच पडणार नाही, कारण चक्क श्वासातून शुगर तपासण्याचं उपकरण तयार करण्यात आलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकाने हे महत्त्वपूर्ण संशोधन केल आहे. नेमकं हे संशोधन काय आहे आणि टाईप पण डायबिटीस रुग्णांसाठी हे संशोधन किती महत्त्वाचं ठरणार आहे? जाणून घ्या.

लहान मुलांमध्ये टाईप वन डायबिटीज चे प्रमाण वाढत आहे. हा डायबिटीस तपासण्यासाठी अनेक सुया टोचून रक्त तपासलं जायचं, या रक्तातून रुग्णाच्या शरीरात किती टक्के शुगर आहे , हे समजतं. मात्र सतत सुई टोचून रक्त काढण्याच्या पद्धतीला आता रुग्ण कंटाळले आहेत. हाच त्रास कमी करण्यासाठी नागपूर विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या हर्ष तिवारी यांनी ब्रिथ अनालायझरच्या माध्यमातून रक्तातील शुगर लेवल तपासणीचं एक डिवाइस तयार केलं आहे. या ‘नॉन-इनवेसिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिवाइस’ मुळे आता फक्त श्वास फुंकून शुगर तपासता येणार आहे.

Nagpur : सुई टोचण्याची कटकट संपली, डायबिटीस तपासण्यासाठी बाजारात येणार नवीन डिवाईस; जाणून घ्या सविस्तर
Political News : शरद पवार गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याने धरली भाजपची वाट; पक्षप्रवेशाचा मुर्हूतही ठरला

हे डिवाइस कसे काम करते?

डायबिटीस रुग्णांची शुगर वाढली की श्वासात Acetone वाढतो. हे लक्षात घेऊन आणि त्यावर अभ्यास करून नागपूर विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या हर्ष तिवारी ‘नॉन-इनवेसिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिवाइस’ तयार केले. हे डिवाइस सेन्सर श्वासातील Acetone detect करतो आणि गणितीय सूत्रांद्वारे रक्तातील ग्लुकोज मोजलं जातं. म्हणजेच शुगर मोजण्यासाठी रक्ताचा एक थेंबही न काढता शुगर तपासणी होते. विशेष म्हणजे या डिव्हाईसला युके डिझाईनचं नोंदणी प्रमाणपत्रही मिळालं आहे आणि संशोधकांनी 100 पेक्षा जास्त रिसर्च पेपर्सचा अभ्यास करून हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे.

Nagpur : सुई टोचण्याची कटकट संपली, डायबिटीस तपासण्यासाठी बाजारात येणार नवीन डिवाईस; जाणून घ्या सविस्तर
Political News : ऐन निवडणुकीच्या काळात बड्या नेत्यानं सोडली भाजपची साथ; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश

आजच्या घडीला साडेनऊ लाखो टाईप वन डायबिटीसचे रुग्ण आहे. टाईप वन डायबिटीस रुग्णांसाठी हे संशोधन विशेष महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या रुग्णांमध्ये insulin तयार होत नसल्यामुळे ब्लडमध्ये ग्लुकोज वाढतो आणि त्याचं प्रतिबिंब श्वासातील Acetone मध्ये दिसतं. लहान मुलं आणि वयोवृद्धांसाठी वारंवार सुई टोचण्याचा त्रास टाळण्यासाठी हे डिव्हाईस एक मोठं वरदान ठरू शकतं. आविष्कार २०२४ मध्ये या डिव्हाईसला पुरस्कार मिळाला. आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शनमध्ये पुरस्कार मिळालेलं हे उपकरण लवकरच मानवी ट्रायलनंतर बाजारात येण्याची शक्यता असून महत्वाचं म्हणजे हे सध्याच्या ग्लुकोमीटरपेक्षा स्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नक्कीच मधुमेह रुग्णांसाठी हा एक मोठा आशेचा किरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com