NASHIK STUDENT DIES OF HEART ATTACK WHILE EXERCISING AT HOME Saam TV News
महाराष्ट्र

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Nashik Boy Dies Suddenly While Exercising: नाशिकमध्ये १५ वर्षीय विद्यार्थ्याचा व्यायाम करताना अचानक हृदयविकाराने मृत्यू झाला. कुटुंबात शोककळा पसरली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

Bhagyashree Kamble

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरी व्यायाम करत असताना दहावीत शिकणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. घटनेच्या दिवशी तो नेहमीप्रमाणे व्यायाम करत होता. घरी व्यायाम करत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. तो खाली पडला. कुटुंबियांनी त्याला तातडीने रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आजकाल ह्रदयाच्या संबंधित आजार लोकांमध्ये वाढत चालले आहेत. कमी वयातच लोकांचे हार्ट अटॅकने मृत्यू होत आहे. क्रिकेट,कब्बड्डी खेळताना मैदानात,व्यायाम करताना जिममध्ये तरूणांचा मृत्यू होत आहे. अशातच नाशिकच्या चांदवडमधील एका मुलाचाही ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृ्त्यू झालाय.

प्रवीण धायगुडे (वय वर्ष १५) असे मृत मुलाचे नाव असून, तो इयत्ता दहावीत शिकत होता. नेहमीप्रमाणे तो घरी व्यायाम करत होता. व्यायाम करत असताना तो अचानक खाली कोसळला. जोरात आवाज आल्यानंतर आईने धाव घेतली. प्रविण कोसळलेला पाहून त्याला तातडीने रूग्णालयात नेले.

डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. प्रविणचा मृत्यू झाल्यानंतर धायगुडे कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. या धक्कादायक घटनेनंतर स्थानिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT