Nandurbar Bus Fire  Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Bus Fire : नंदुरबारमध्ये ST बसला लागली अचानक आग; प्रवाशांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला

Nandurbar Bus Fire Latest News : नंदुरबारच्या तळोदा रस्त्यावर नाशिक-अक्कलकुवा बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये ३० प्रवाशी होते. या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली

Vishal Gangurde

सागर निकवाडे, नंदुरबार

Nandurbar Bus Fire News :

गेल्या काही वर्षांपासून वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. गेल्या वर्षभरात या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार नंदुरबारमध्येही घडला. नंदुरबारच्या तळोदा रस्त्यावर नाशिक-अक्कलकुवा बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. या बसमध्ये ३० प्रवाशी होते. या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुबारमध्ये एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. नंदूरबारच्या तळोदा रस्त्यावरील नाशिक-अक्कलकुवा बसला अचानक बसला आग लागली. नंदुरबार शहराजवळ असलेल्या जोगेश्वारी माता मंदिराजवळ आग लागली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आग लागल्याचे प्रवाशांना लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने बसमधून बाहेर उतरले. सर्व प्रवाशी बसमधून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. या एसटी बसमध्ये ३० प्रवासी होते.

उत्तर प्रदेशमध्ये बसला अचानक आग

उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्येही काल बसला आग लागल्याची घटना घडली. बसवर हायव्होल्टेज विजेची तार पडल्याने बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत काहीजण होरपळले.

गाझीपूरमध्ये या बसमध्ये ५० प्रवासी होते. ही बस एका लग्न समारंभातून परतत होती. बसला आग लागल्यानंतर जिल्ह्याधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haldi Kunku Gift Idea : बेस्ट हळदी–कुंक वाण आयडिया, उपयोगी आणि बजेटमध्ये बसणाऱ्या खास वस्तू

Leopard News : बिबट्या अकोल्यात पोहचला, बाळापूरमध्ये ४ पिल्लांसह आढळला, एक शेतकर्‍याच्या हाती लागले, पण...

Maharashtra Live News Update: जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी योजनेतून ६ लाख शेतकऱ्यांना वगळले? तुम्हाला ₹२००० मिळणार की नाही? असं करा चेक

Lagnanantar Hoilach Prem Video : जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याचा संसार मोडला? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT