Liquor Ban Saam tv
महाराष्ट्र

Liquor Ban : गावात दारूबंदीसाठी मतदान; गावातील १२६० महिलांच्या मतदानावर ठरणार निर्णय

Nandurbar News : नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील असलोद या गावात सर्रासपणे दारू विक्री केली जात आहे. या दारूच्या नशेत तरुण मुले देखील राहत असल्याने गावात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गावात दारूबंदीची मागणी अनेक वर्षापासून करण्यात आली होती.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी आणि सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता. प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी महिलांचे मतदान आज सकाळी आठ वाजता सुरू झाले. सकाळपासूनच मतदानासाठी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून यात आडवी बाटली जिंकते की उभी हे पाहणे मतदानानंतर होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी ठरेल. 


नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील असलोद या गावात सर्रासपणे दारू विक्री केली जात आहे. या दारूच्या नशेत तरुण मुले देखील राहत असल्याने गावात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे गावात दारूबंदीची मागणी अनेक वर्षापासून करण्यात आली होती. मात्र यावर निर्णय होत नसल्याने अखेर गावातील महिला व सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्यानंतर गावात दारूबंदी करण्यासाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आज गावात मतदान प्रक्रिया राबविली जात असून या प्रक्रियेत गावातील १२६० महिला मतदार दारूबंदीसाठी मतदान करणार असल्याची माहिती तहसीलदार गिरासे यांनी दिली. 

गावात दारूबंदीच्या मागणीसाठी आम्ही अनेक वर्षापासून लढा देत होतो. दारूमुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होत आहे. तर आमच्या गावातील तरुण व्यसनाधीन होत असून अनेकांचे परिवार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावात दारूबंदी करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येत मतदानाची मागणी केली होती. अखेर प्रशासनाने आमची मागणी मंजूर केली असली तरी जास्त जास्त महिलांनी मतदानासाठी यावे अशा आव्हान महिलांनी केले आहे. 

गावात दारूबंदीसाठी महिलांनी घेतलेला निर्णय आणि त्यांना मिळालेली गावकऱ्यांची साथ यामुळे गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरवात झाली असून मतदान केंद्रांवर मतदानासाठी महिलांच्या रांगा लागल्या आहेत. तर गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी असून आता या लढाईत महिला जिंकतात की गावातील अवैध व्यवसाय करणारे हे मतदानाच्या वेळेस समजेल. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT