Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : ई केवायसीसाठी बँकांच्या बाहेर एक किलोमीटरपर्यंत रांग; लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्दी

Nandurbar News : नंदुरबार जिल्हा हा दुर्गम भागातून ग्रामीण भागात बँकांची संख्या कमी असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकांमध्ये महिला लाभार्थ्यांची त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बँक खाते केवायसी असल्याशिवाय अकाउंटवर पैसे येत नाही. यामुळे बँक खाते आधारही लिंक करून केवायसी करण्यासाठी लाभार्थी महिलांची मोठी गर्दी होत असून महिलांचे हाल होत आहेत. यातअनेक  बँकांमध्ये एक किलोमीटरपर्यंत मोठ्या रांगा दिसून येत आहे.

नंदुरबार (Nandurbar) जिल्हा हा दुर्गम भागातून ग्रामीण भागात बँकांची संख्या कमी असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकांमध्ये महिला लाभार्थ्यांची त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी अर्ज भरले आहेत. यासाठी दिलेल्या बँक (Bank) खात्याचे केवायसी असणे गरजेचे आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली असली तरी या योजनेसाठी महिलांनी दिलेल्या बँक अकाउंट केवायसी आवश्यक आहे. यामुळे शहादा शहरातील बँकांमध्ये महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. 

पहाटेपासूनच बँकेबाहेर रांग 

अगदी पहाटेपासूनच बँकांमध्ये केवायसी करण्यासाठी महिलांच्या रांगा लागत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. शहादा (shahada) शहरातील बँकांच्या बाहेर जवळपास एक किलोमीटर पर्यंत लाभार्थ्यांची लाईन पाहण्यास मिळाली. यामुळे सरकारने केवायसीसाठी वेगळी यंत्रणा उभी करून लाडक्या बहिणीचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी ग्रामीण भागातील महिलांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप! बड्या नेत्यानं सोडली शरद पवार गटाची साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

SCROLL FOR NEXT