शहादा (नंदुरबार) : अवैधपणे कारमधून वाहतूक केला जाणारा बिअरचा साठा पोलिसांनी पकडला आहे. ही बिअर मध्य प्रदेशातुन (Gujrat) गुजरात राज्यातील नवसारी येथे नेली जात असताना शहादा (Shahada) पोलिसांनी चार लाख ८१ हजार रुपयांचा बिअरचा साठा जप्त केला. याप्रकरणी एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे. (Latest Marathi News)
मध्य प्रदेशच्या पानसेमल येथून काही वाहनांमधून गुजरात राज्यातील नवसारी येथे मध्यप्रदेशच्या बॉर्डर चेक पोस्टमार्गे मद्याची बेकायदा वाहतूक केली जात असल्याची माहिती (Nandurbar) पोलिसांना मिळाली. या नंतर पोलिसांनी (Police) सापळा रचत चेकपोस्टजवळ वाहनांची तपासणी सुरू केली असताना नऊच्या दरम्यान एक कार पानसेमल- मेंद्राणा हद्दीतून नवानगर चेक पोस्टकडे संशयास्पद रित्या येताना दिसली. कार थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु चालकाने नवानगर चौफुलीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांनी पाठलाग सुरु करताच चालकाने कार कुरंगी गावाजवळील नाल्यात सोडून पलायन केले. त्यापैकी एकाला ताब्यात घेण्यात आले. मनोज बन्सीराज राजपूत (वय ४४) असे संशयिताचे नाव आहे. कारमध्ये मध्यप्रदेश राज्यात निर्मित सुमारे एक लाख २६ हजार रुपये किमतीचा बिअरचा साठा मिळून आला. पोलिसांनी कारसह चार लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस शिपाई विकासकुमार शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.