Jalna Lok Sabha : जालन्याची जागा काँग्रेसच्या वाटेला; दानवे विरुद्ध काळे यांच्यात पुन्हा लढत होण्याची शक्यता

Jalna News : महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आज पार पडली. या पत्रकार परिषदेत जालना लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसला सोडण्यात आला आहे.
Jalna Lok Sabha
Jalna Lok SabhaSaam tv

जालना : लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून (Jalna) अद्याप उमेदवार नव्हता. मात्र महाविकास आघाडीकडून आज हा तिढा सोडवत जाळण्याची जागा काँग्रेसला सोडली आहे. यामुळे येथे (BJP) भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.  (Maharashtra News)

Jalna Lok Sabha
Sambhajinagar Corporation : एप्रिलमध्ये कर भरा मिळवा १६ टक्केपर्यंत सूट; मनपाचे सप्ततारांकित धोरण

महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) पत्रकार परिषद आज पार पडली. या पत्रकार परिषदेत जालना लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसला (Congress) सोडण्यात आला आहे. काँग्रेसकडून या मतदार संघात पुन्हा काँग्रेचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे जालना लोकसभा मतदार संघात पुन्हा २००९ प्रमाणे (Raosaheb Danve) दानवे विरुद्ध काळे अशी रंगतदार दुरंगी लढत पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jalna Lok Sabha
Songir Accident : महामार्ग दुरुस्ती करणाऱ्या मजुरांना भरधाव डंपरने उडविले; एकाच मृत्यू, मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना पहिल्यांदाच काट्याची टक्कर देत घवघवीत मत मिळवले होते. मात्र या निवडणुकीत कल्याण काळे यांचा आठ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसकडून कल्याण काळे यांची उमेदवारी निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यामुळे दानवे यांच्या समोर काळे या लोकसभा निवडणुकीत कसे आव्हान उभ करतात; हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दानवे यांनी ही लोकसभा विकासावर लढणार असल्याच उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हंटल आहे. तर काळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढून दानवे यांच्या समोर आव्हान उभे करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com