Ahmednagar Water Supply: अहमदनगर शहराच्या २० टक्के पाणी कपात; पाटबंधारे विभागाचे आयुक्तांना पत्र

Ahmednagar Dam Water Level News: राज्यात यंदा कमी झालेल्या पावसामुळे पाण्याची समस्या बिकट बनत चालली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणी साथ देखील खालावत चालला आहे.
Ahmdnagar Water Shortage News
Ahmdnagar Water Shortage NewsSaam tv

सुशील थोरात 

Ahmednagar Water Supply News:

यंदा सर्वदूर पाणी संकट उभे राहिले आहे. यात आत अहमदनगर (Ahmednagar) शहरावर देखील पाणी संकट उभे राहिले असून मुळा धरणातून (Mula dam) होणाऱ्या पाणी पुरवठ्यात २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना पत्र देखील देण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

Ahmdnagar Water Shortage News
Songir Accident : महामार्ग दुरुस्ती करणाऱ्या मजुरांना भरधाव डंपरने उडविले; एकाच मृत्यू, मुंबई-आग्रा महामार्गावरील घटना

राज्यात यंदा कमी झालेल्या पावसामुळे (Rain) पाण्याची समस्या बिकट बनत चालली आहे. अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाऊस कमी झाल्यामुळे धरणातील पाणी साथ देखील खालावत चालला आहे. त्यानुसार (Jayakwadi Dam) जायकवाडी धरणात मुळा धरणातून १.९६ टीमसी पाणी सोडण्यात आल्याने तसेच धरणात पाणीसाठा कमी होत चालला आहे. यामुळे संभाव्य पाणी टंचाई निवारणाकरिता अहमदनगरला केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्यात २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Ahmdnagar Water Shortage News
Jalna Lok Sabha : जालन्याची जागा काँग्रेसच्या वाटेला; दानवे विरुद्ध काळे यांच्यात पुन्हा लढत होण्याची शक्यता

आयुक्तांना पाठविले पत्र

अहमदनगर शहरासह मुळा धरणावरील पाणीपुरवठा योजनेचे २० टक्के पाणी कपात करण्याचा पाटबंधारे विभागाने निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या मंजूर कोट्यातुन ही पाणी कपात करण्यात आली असून ३१ जुलै २०२४ पर्यत काटकसरीने वापर करण्याबाबतचे पात्र पाटबंधारे विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com