Shahada News Saam tv
महाराष्ट्र

Shahada News : शहादा तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा; मोलमजुरी करून बांधलेले घर कोसळले, आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. तर शहादा तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील पूर्व भागात प्रचंड नुकसान

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा अजूनही सुरूच आहे. याचा फटका अनेकांना बसला आहे. यातच शहादा तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यात झाडे उन्मळून पडली आहेत. तर मोलमजुरी करून उभारलेले घर पडल्याने आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. पडलेले घर पाहून वृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. 

नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. तर जिल्ह्यातील शहादा तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे शहादा तालुक्यातील पूर्व भागात प्रचंड नुकसान झाले आहे. मंदाना आणि गोगापूर गावात घरांचे पत्रे उडाले असून अनेक ठिकाणी झाडे उलमडून पडले तर काही ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. वादळी वाऱ्यामुळे एका बैलाचा मृत्यू झाला आहे. 

संसार पडला उघड्यावर 
चक्रीवादळाच्या तडाख्यात घरावरील पत्रे उडाली आहेत. तर आदिवासी कुटुंबाने मोलमजुरी करून बांधलेले घर देखील कोसळले आहे. शिवाय घरात पाणी शिरल्याने साठवून ठेवलेले धान्यासह कपडे पाण्यात भिजले आहेत. आदिवासी कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. हे सगळे पाहून वृद्ध दाम्पत्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. आदिवासी कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे.  

बार्शी तालुक्यातील घराचं छत गेलं उडून  

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्यातील घराचं छत उडून गेले आहे. मुसळधार पावसामुळे तडवळे गावातील घरांचे छत पडले आहे. तर काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. यामुळे तडवळे गावातील ग्रामस्थांना रात्र पावसाच्या पाण्यात भिजून काढावी लागली आहे. दरम्यान घटनेला तब्बल १२ तास उलटून गेल्यानंतर देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पडझड झालेल्या घरांची पाहणी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जीमला जाण्यापूर्वी प्रत्येकाने या मेडिकल टेस्ट करून घ्याव्यात, हार्ट अटॅकचा धोका टळेल

शिवसेना मनसेच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं, कोणत्या वार्डातून कोणाचा उमेदवार?

Maharashtra Live News Update: कफ परेडला जाणाऱ्या मेट्रोचे दरवाजे बंद होईना, प्रवाशांचे हाल

Watches Design: डेली ऑफिस वेअरसाठी हातात घाला 'हे' युनिक डिझाइनचे वॉच; प्रोफेशनल लूक दिसेल क्लासी!

भाजपचा डाव काँग्रेसच्या जिव्हारी, २ माजी आमदारांनी घेतलं कमळ, शेकडो समर्थकांनी सोडली साथ

SCROLL FOR NEXT