Papaya Crop : काढणीला आलेली पपई बाग भुईसपाट; अवकाळी पावसाचा फटका, सोलापुरातील शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Solapur News : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी
Papaya Crop
Papaya CropSaam tv
Published On

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने फळबागांचे तसेच कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. यातच परिपक्व होऊन काढणीला आलेली पपईची बाग भुईसपाट झाली आहे. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

मागील १५ ते १६ दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकासह फळ बागेचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरीराजा सरकारकडे करत आहे.

Papaya Crop
Ujani Dam : सोलापूर जिल्हावासीयांसाठी आनंदाची बातमी; पहिल्यांदाच मे महिन्यात उजनी धरण आले प्लसमध्ये, पाण्याची समस्या मिटली

पाच एकर क्षेत्रातील बागेचे नुकसान 

सोलापूर जिल्ह्यतील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे राहत असलेले शेतकरी मल्लिनाथ पटणे यांचे पपई बागेचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी मल्लिनाथ पटणे यांनी डिसेंबर २०२४ मध्ये पाच एकरात पपईची लागवड केली होती. पाच एकरात मल्लिनाथ पटणे यांनी ५ हजार पपईच्या रोपांची लागवड केली होती. यामुळे आता हि पपई परिपक्व झाल्याने फळ तोडणीवर आले होते. अशात अवकाळी पाऊस सुरु झाल्याने होत्याचे नव्हते केले. 

Papaya Crop
ZP School : जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घर व पाणीकर माफ; भडगाव ग्रामपंचायतचा अनोखा निर्णय

२५ लाख रुपयांपर्यंत नुकसान 

पपईचा एक रोप साधारणतः नऊ ते दहा रुपयापर्यंत मिळाला होता. पाच एकरात पपई लागवड, औषध फवारणी, खत इत्यादी खर्च मिळून चार ते साडे लाख रुपये पर्यंत खर्च आला होता. परंतु पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या पपईच्या बाग शेतकरी मल्लिनाथ पटणे यांच्यासमोर पपईच्या झाड उन्मळून पडले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी मल्लिनाथ पटणे यांचे जवळपास २० ते २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com