Political Tension Rises in Nandurbar Saam
महाराष्ट्र

शिंदेसेनेच्या आमदाराकडून भाजप नेत्याला धमकी; राजकारण तापलं, नेमकं घडलं काय?

Political Tension Rises in Nandurbar: नंदुरबारमध्ये राजकारण तापलं. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर भाजप उमेदवाराला धमकी दिल्याचा गंभीर आरोप.

Bhagyashree Kamble

  • नंदुरबारमध्ये राजकारण तापलं

  • शिवसेना शिंदेसेनेच्या नेत्याकडून भाजप उमेदवाराला धमकी

  • भाजप महिला नेत्याकडून गंभीर आरोप

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जवळ येताच येथे राजकीय वातावरण तापले असून, पक्षांतर आणि पक्षफोडीचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. अशातच नंदुरबारमध्ये धमकीचे प्रकरण समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नंदुरबारमध्ये उमेदवाराला फोडण्यासाठी शिवसेना शिंदेसेनेच्या आमदाराने धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख आणि विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी यांना फोडण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप भाजप नेत्या आणि माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत केला.

डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून साम-दाम-दंड-भेदाचा वापर केला जात आहे. कार्यकर्त्यांना दम दिला जात आहे. नंदुरबार नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अविनाश माळी यांच्यावर दबाव टाकला जात आहे', असा गंभीर आरोप डॉ. गावित यांनी केला आहे.

डॉ. गावित यांनी असा दावा केला की, 'नंदुरबारमधील दीर्घकाळ असलेल्या सत्तेचा कंटाळा आला असून, जनता आता बदलाची मागणी करत आहे. यामुळे भाजप उमेदवार निश्चितच विजय मिळवतील. काँग्रेस आणि शिवसेनेला पराभव जवळ दिसत आहे. यामुळे नेत्यांकडून आता दबावतंत्र वापरले जात आहे', असंही डॉ. गावित म्हणाल्या.

आमदार रघुवंशी यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे निवडणुकीचं वातावरण अधिक तापले असून, स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात आज महाविकास आघाडीची बैठक

लग्नसराईत सोनं - चांदीला चकाकी, २४ कॅरेट १ तोळं सोन्याच्या दरात किती रूपयांची वाढ? वाचा लेटेस्ट दर

Pune to Nagpur : पुण्याहून नागपूरला फक्त ५ तासांत, नितीन गडकरींचा दावा, ७०० किमीचा मार्गही सांगितला

Ayushman Card: आयुष्मान योजनेत ५ लाखांपर्यंत मोफत उपचार; वर्षातून किती वेळा घेता येतो लाभ?

Green Chilli Halwa: हिरव्या मिरचीचा हलवा कधी खाल्लाय का? अंकिता लोखंडेने शेअर केली खास रेसिपी

SCROLL FOR NEXT