Nandurbar Water Scarcity  Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील १९५ गावे, २२१ पाड्यांमध्ये पाणीटंचाई; कमी पावसाचा परिणाम

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील गावपाड्यांसह इतर भागांतील लघु आणि मध्यम प्रकल्पात भूजल कमी होत आहे. यामुळे येत्या काळात पाणीटंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे दोन तालुक्यांत पूर्ण तर इतर (Nandurbar) तालुक्यातील मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परिणामी यंदा जिल्ह्यातील १९५ गावे आणि २२१ पाड्यांमध्ये पाणीटंचाईच्या (Water scarcity) सामना करावा लागणार आहे. (Live Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यातील गावपाड्यांसह इतर भागांतील लघु आणि मध्यम प्रकल्पात भूजल कमी होत आहे. यामुळे येत्या काळात पाणीटंचाईत वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात भूजल पातळी ही साडेपाच फुटांपर्यंत खोल गेली आहे. भूजल खोल जातानाच सहा मध्यम, दोन बॅरेज आणि १२ लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. या साठ्यावर अवलंबून असलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना पाणी कपातीचे धोरण आतापासूनच स्वीकारावे लागले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उपाययोजना कधी? 

यंदा नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी (Rain) पाऊस झाला आहे. यामुळे आतापासूनच पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. दरम्यान जिल्ह्यात यंदा जून २०२४ पर्यंत पाणीटंचाई राहणार असल्याने शासनाकडून कधी उपयोजना सुरू करण्यात येतील हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla beetroot carrot juice: रिकाम्या पोटी आवळा, बीट अन् गाजराचा ज्यूस प्यायलात तर काय होईल? वाचा

Maharashtra News Live Update: अभिजित दिपकेंसह सीपेजीचे ३ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी

Navratri Kamarband Designs : गरबा नाइटसाठी रॉयल लूक! घागरा चोळीवर ट्राय करा कंबरपट्टाचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगारवाढ कधी होणार? एरियर आणि फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट समोर

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर घरच्या घरी कसा चेक कराल? जाणून घ्या ७-२-२ चा नियम

SCROLL FOR NEXT