

दोन दिवसांपूर्वीच्या वादाचा राग; विद्यार्थ्यावर चॉपरने वार करून गंभीर जखमी
शाळा परिसरात घटना; दहावीच्या विद्यार्थ्याला चॉपर हल्ल्यात गंभीर दुखापत
कुसुंबा येथील विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; कठोर कारवाईची पालकांची मागणी
जालन्यातील भोकरदन येथे महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, मलब्याखाली दबून एका मजुराचा मृत्यू तर चौघेजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती...
भोकरदन शहरातील अन्वा रोडवरील महाविद्यालयाचा सायंकाळी स्लॅब कोसळल्याची घटना घडली...
या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून चौघेजण जखमी झाल्याची माहिती आहे...
जखमींवर भोकरदन आणि जालना येथे उपचार सुरू असल्याची देखील माहिती आहे..
बीडमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला अटक करण्याच्या मागणीसाठी घुले कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला. घुले कुटुंबीयांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सुषमा घुले यांच्या भावाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील इमारतीच्या छतावर चढून आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
धाराशिवच्या परांडा शहरात भर दुपारी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. लाठ्या-काठ्या आणि दगडांचा वापर करत एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या घटनेचे व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित झाले आहेत. एकमेकांकडे पाहण्यावरून सुरू झालेला शाब्दिक वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे. या घटनेमागे राजकीय वाद असल्याची चर्चा असून, नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. हाणामारीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती असून, शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांचं कौतुक केलं. समाजाच्या कल्याणासाठी लाड मेहनत करत असून, समोरच्यांनीही त्यांना प्रतिसाद द्यायला हवा, असं जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी प्रवीण दरेकर यांना ‘बिगर मिशीचा’ म्हणत टोला लगावला. प्रसाद लाड यांच्यावर टीका करणाऱ्यांना आम्ही मोजत नाही, त्यांना कोलतो, असं म्हणत त्यांनी नाव न घेता लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा साधला. तसेच प्रमाणपत्र रद्द करण्याचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नसल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला.
अहिल्यानगर -
भोंदू अशोक खरातसह समता पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी...
राहता न्यायालयाने सुनावली कोठडी...
समता पतसंस्थेत बनावट खाती आणि कोट्यवधींच्या व्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडी...
समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत 57 लोकांच्या नावे उघडलीय 100 खाती...
खात्यावरून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार...
दाखल गुन्ह्यात खरात गेल्या सात दिवसांपासून शिर्डी पोलीसांच्या कोठडीत..
राहाता कोर्टाने खरातसह पतसंस्थेचा व्यवस्थापक मिलिंद बनकर याला सुनावली चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी...
जालना -
जालन्यातील बदनापूर तालुक्यातील चनेगाव ग्रामस्थ झाले आक्रमक
थेट विद्युत डीपीवर चढून आंदोलन
जलजीवन मिशन अंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन
अनेकदा निवेदने आणि तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल घेतली नसल्याच ग्रामस्थांचं म्हणणं
तर राजूर छत्रपती संभाजी नगर हा महामार्ग देखील धरला रोखून
धाराशिव -
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील धाराशिवच्या खेड गावात दाखल
खेड गावात जरांगे पाटलांचे जेसीबीतुन फुलांची उधळण करत स्वागत
महीलांनी जरांगे पाटलांना ओवाळत केले औक्षण
जरांगे पाटील गावकऱ्यांशी साधणार संवाद
आज जरांगे पाटलांचा तुळजारात मुक्काम
पुणे -
ढोल-ताशा पथकांच्या सरावाच्या वेळा अन् जागा होणार निश्चित
पुणे महापालिका लवकरच लागू करणार नियमावली
पुण्यातील गणेशभक्तांसाठी मोठी बातमी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील नदीपात्र, महापालिकेची मोकळी मैदाने आणि शाळांच्या प्रांगणात ढोल-ताशा पथकांनी सराव सुरू आहे
निवासी भागांजवळ होणाऱ्या सरावामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि स्थानिक रहिवाशांकडून तक्रारींनंतर पुणे महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे
मुंबई गोवा महामार्गावरील लोणेरे येथील पुलाच्या पहाणीनंतर मंत्री भरत गोगावले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
दोन, तीन रस्त्याची खराबी आम्हाला दिसते.
ती व्यवस्थित करावी अन्यथा तोडून मोडून परत नवीन करायच असा इशारा गोगावले यांनी दिला आहे.
गडचिरोली -
हजारोच्या संख्येने आष्टी येथे महिला- पुरुष आणि बालकासहित चक्काजाम आंदोलन
आम्ही आमच्या जमिनी देणार नाही एमआयडीसी रद्द करा आणि सात लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते सुद्धा मागे घ्या
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील येनापुर परिसरातील 14 गावांनी आज आष्टी येथे चक्काजाम आंदोलन सुरू केलेला आहे आष्टी आलापली सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद आहे
नाशिक
मनमाड नगरपरिषदेच्या नगरसेवकाला मोठा धक्का
शेख मजीद इब्राहिम ६ वर्षांसाठी अपात्र
जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश;
तालुक्यातील लोहारा येथे मन नदीत बैलगाडी उलटून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत २८ वर्षीय शाहिद आसिफ देशमुख नदीच्या पाण्यात वाहून गेले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. बैलगाडीतील चारही बैलांचा बुडून मृत्यू झाला. नदीपात्रात रेती उपशामुळे निर्माण झालेल्या खोल खड्ड्यामुळे बैलगाडी उलटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दुर्घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत आणि सून गिरीजा राऊत कौटुंबिक प्रकरणात विनायक राऊत यांच्या सह सहा आरोपींना अटकपूर्व जामीन ठाणे सत्र न्यायालयाने केला मंजूर..
विनायक राऊत यांना ठाणे सत्र न्यायालयाचा दिलासा
न्यायाधीश एस पी अग्रवाल मॅडम यांच्या सत्र न्यायालयात जामीन मंजूर..
गिरिजा राऊत यांचे वकील सागर कदम या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता..
भरत फोर्जच्या कर्मचाऱ्याला गुंगीचे औषध देऊन क्रिकेट बॅटने मारहाण; घरातच बांधलेल्या सिमेंटच्या कट्ट्यात पुरण्याचा प्रयत्न, ११२ वर आलेल्या गूढ फोनमुळे जीव वाचला
तिवसा मतदारसंघाचे आमदार रविराज देशमुखच होते पण तेव्हा त्यांचे तिकीट कापायचं काम मीच केलं पण आता तिवसा मतदारसंघात बदल निश्चित आहे असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर अमरावतीत भाजपने तडकाफडकी पत्रकार परिषद घेत आमदार रवी राणा यांच्यावर पलटवार केला.. तिवसा चे भाजपा चे आमदार राजेश वानखडे,भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रताप अडसड आणि आमदार प्रवीण पोटे यांनी रवी राणा यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला,आमच्या पार्टीचा तिकीट कापण्याचा विषय वरिष्ठ भाजप ठरवतात.
गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पुण्यातील तीन पोलिस स्टेशनला मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावलीय. त्यामुळे एकीकडे गुन्हेगारी रोखण्यासाठी वरिष्ठांचा दबाव तर दुसरीकडे मानवाधिकार आयोगाची नोटीस अशा दोन्ही बाजूंनी पुणे पोलिसांची चांगलीच कुचंबना होतेय. दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपींची धिंड काढल्यामुळे तर दुसरीकडे दुचाकीला फटका सायलेन्सर लाऊन दहशत माजवणाऱ्या तरुणांना उठा बशा काढायला लावल्यामुळे अशा तीन प्रकरणात तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांना नोटीस बजावली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या व लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना न्याय मिळावा, ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी आणि पात्र अर्जांचा फेरविचार करावा, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे यवतमाळ येथील शिवतीर्थ ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाध्यक्षा मनीषा काटे यांच्या नेतृत्वाखाली लाडक्या बहिणींनी एल्गार मोर्चा काढण्यात आला.यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या एल्गार मोर्चा मोठ्या संख्येने महिला व पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.
6.22 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पहिला हप्ता मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आला. शहराध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, महिला शहराध्यक्षा पूनम शेलार, नगरसेवक सचिन पाटील आणि नगरसेविका सुनीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारत तो पायदळी तुडवला आणि जोरदार घोषणाबाजी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात सपकाळ यांच्या निषेधाचा बॅनर लावण्यात आला. काँग्रेसने सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. यावेळी सदाशिव पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
शिरपूर शहरातील जुने मांडल रोड परिसरात हायड्रा क्रेन आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एका 60 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांना बस स्थानकावर सोडण्यासाठी जाणारा त्यांचा तरुण मुलगा यात गंभीर जखमी झाला आहे, दोन दिवसांपूर्वीच मुलाला भेटण्यासाठी शिरपुरात आलेले वडील गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.
विजय चौधरींना अटक केल्यानंतर आज न्यायालयात करण्यात आलं होतं हजर....
न्यायालयात हजर केल्यानंतर विजय चौधरींना सुनावण्यात आली चार दिवसांची पोलीस कोठडी....
भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप मध्ये माजी खासदार हिना गावित यांच्या बद्दल आक्षेपरीय आणि अश्लील वक्तव्य केल्याचा आरोप....
डॉ. हिना गावित यांच्या भावाने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी आज चौधरी यांना न्यायालयात हजर करण्यात आले...
भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्याविरुद्ध तीन ॲट्रॉसिटीचे आणि एक विनयभंगाचा असे एकूण 3 गुन्हे दाखल..
पंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. विकासाबाबत चर्चा झाली. ६ खासदारांनी मोदींसोबत ब्रेकफास्ट केला, असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. नीटवर सरकार चर्चा करायला तयार आहे, पण यांना चर्चा करायची नाही, असे शिंदे म्हणाले.
कोल्हापूरच्या ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे नऊ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी संपूर्ण नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. यावेळी नाट्यगृहातील बैठक व्यवस्था, साऊंड सिस्टिम, लाईट व्यवस्था, मेकअप रूम यांसह परिसराची पाहणी केली. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामध्ये संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या उद्घाटना बरोबरच 3200 कोटी रुपयांच्या पूर नियंत्रण प्रकल्प, रंकाळा परिसर सुशोभीकरण लोकार्पण, सीपीआर हॉस्पिटलचा उद्घाटन, शाहू महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पण या सह जिल्ह्यातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हिंगोली शहरासह परिसरात 24 तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे, हिंगोली तालुक्यात देखील काही भागांमध्ये हा पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर खरिपाच्या हंगामातील तूर उडीद मूग यासह हळद व कापूस या पिकाला या पावसामुळे मोठा फायदा होणार असल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत
जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरणीचा कल असलेल्या सराफा बाजाराने आज अचानक यू-टर्न घेतला असून, डॉलर मजबूत झाल्याचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला आहे.
भंडारा शहरातील एका अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या अत्यंत घृणास्पद अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण भंडारा शहर हादरून गेले आहे. या नराधम आरोपीवर कडक कारवाई करून त्याला तात्काळ फासावर लटकवण्यात यावे, या मुख्य मागणीसाठी आज भंडाराकरांनी रस्त्यावर उतरत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली.
बांधकाम व्यवसायिकाच्या चुकीच्या खोदकामामुळे पहिल्याच पावसात कोसळली होती संरक्षक भिंत
संरक्षक भिंत कोसळून खचला होता रस्ता
आता पुन्हा एकदा संरक्षक भिंतीच काम सुरू असताना वाहतुकीसाठी वापरात असलेल्या रस्ता खचला
पुण्याच्या इंदापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांवर काँग्रेसने केलेल्या टीकेच्या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली आहे. पुणे जिल्हा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी इंदापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत काँग्रेसचा निषेध नोंदवला आहे.
जळगावच्या भुसावळ नगरपालिकेच्या आवारात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कचरा फेको आंदोलन करण्यात आले. शहरातील नालेसफाई आणि स्वच्छतेच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली चावरे यांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांना जोडणारा पाचगणी–महाबळेश्वर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.त्यामुळे पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे.ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे दररोज हजारो पर्यटक, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
खामगाव ग्रामीण पोलिसांनी शेलोडी शिवारातील शिवसेना शिंदे गटाचा तालुकाप्रमुख याच्या शेतातील टीनशेडवर मध्यरात्री छापा टाकून सुरू असलेल्या 'एक्का बादशहा' जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाईत १२ आरोपींना ताब्यात घेऊन एकूण ८ लाख ४३ हजार ८६० रुपयांचा जुगार मुद्देमाल जप्त करण्यात आला
डॉक्टरांना मारहाण प्रकरणात अटकेत असलेले नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने रमेश म्हात्रे यांच्यासह या प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.
जामीनाच्या अटींनुसार रमेश म्हात्रे यांनी पुढील आदेशापर्यंत महाराष्ट्राबाहेर राहावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
बीडच्या गेवराई तालुक्यातील शृंगारवाडी येथील बालनंदनवन इंग्लिश स्कूल मध्ये असलेल्या जिल्हा परिषद अंतर्गत वसतिगृह आहे. याच वसतिगृह परिसरात दहा वर्षाची विद्यार्थिनी खेळत होती. यावेळी पायाला काहीतरी चावले आहे म्हणत वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना सांगितले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ तिची दखल घेत बीडचे शासकीय रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
लोणावळा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावस सुरू.. मुसळधार पावसामुळे डोंगरावरील सैल झाले. त्यामुळे लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा राडारोडा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून शालेय विद्यार्थी, शेतकरी, तसेच दुग्धव्यवसाय करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत आज शेगाव, खामगाव दौऱ्यावर असून मोहन भागवत यांनी शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन श्रीच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच श्रींच्या चरणी नतमस्तक झाले .. यावेळी शेगाव मंदिर प्रशासनाकडून ही मोहन भागवत यांचा सत्कार करण्यात आला .
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे यांनी प्रशासनावर टीका केली. २०१५ च्या कुंभमेळ्यावेळीही विकासकामे झाली होती आणि ती पूर्ण झाल्यानंतर लोकांना प्रत्यक्षात त्या कामांची गुणवत्ता व परिणाम दिसून आला होता, असे त्यांनी सांगितले. मात्र सध्याच्या सिंहस्थाच्या तयारीत प्रशासन पूर्णपणे ढिम्म असल्याचा आरोप करत विकासकामांच्या गतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिठद येथील नाल्यावरील बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात काडीकचरा, झाडांच्या फांद्या आणि लाकडे अडकत असल्याने पाण्याचा प्रवाह रोखला जातो. त्यामुळे पाणी साचून गावात घुसण्याचा धोका निर्माण होत असल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तलेरा हॉस्पिटलमध्ये एक मोठा स्फोट होऊन गॅस गळती झाली आहे. त्यामुळे हॉस्पिटल शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीच वातावरण आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना तलेरा हॉस्पिटलमध्ये घडल्याने हॉस्पिटल शेजारी राहणारे नागरिक भीती व्यक्त करत आहेत.
हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून एका तरुणाची लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट) घडली होती. या हल्ल्यात एक तरुणीही गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर पंढरपूरच्या दिशेने पळून जाणाऱ्या संशयित आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर नाकाबंदी करून ताब्यात घेतले.
पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यातील वाघोली गावात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल सायंकाळी काही स्थानिक शेतकर्यांना बिबट्या ऊसाच्या शेतात लपून बसल्याचे दिसून आले.
याची माहिती वनविभागाला देण्यात आली असून बिबट्याला पकडण्यासाठी कॅमेरे आणि सापळे लावण्यात आले आहेत.
नागरिकांनी व शेतकर्यांनी बिबट्या पासून सावध राहावे असे आवाहन वन अधिकारी समाधान आटोळे यांनी केले आहे.
नर्सेसच्या दुर्लक्षामुळे वयोवृद्ध नागरीकाला बसले ईसीजी मशीनचे चटके
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक घटना
वयोवृद्ध नागरिकांवर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार
राज्यात ३० हजार जागांसाठी होणार शिक्षक भरती
११ ऑगस्ट पर्यंत अर्ज लॉक करता येणार आहेत
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था , खाजगी आस्थापना या मध्ये पवित्र पोर्टल द्वारे भरती होत आहे
वाशिमच्या मालेगाव शहरात चोरांचा धुमाकूळ सुरूच असून, काल रात्री केळी रोड आणि अंकल नगर परिसरातील चार घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी संतोषी माता मंदिराजवळही मोठी चोरी झाली होती.
मात्र, या चोरीचा अद्याप उलगडा झालेला नाही.
सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, चोरट्यांचा बंदोबस्त करून चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी होत आहे.
एक महिन्यात खडकवासला धरण साखळीत 43 टीएमसी पाणी जमा सततच्या पावसामुळे 17 टीएमसी पाणी सोडले
जुलै महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे क्षमतेपेक्षा दीडपट जास्त पाणी धरण क्षेत्रात जमा झाल्याची माहिती
जुलै महिन्यात 43 टीएमसी पेक्षा अधिक पाण्याची आवक झालीय त्यापैकी 12.33 टीएमसी विसर्ग खडकवासल्यातून मुठा नदीत करण्यात आल्याची माहिती
खडकवासला धरण सापळीची चारही धरणाची क्षमता 29.15 टीएमसी आहे. जुलै महिन्यात चारही धरणे शंभर टक्के भरले आहेत
* मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पत्रकार परिषद
* राज ठाकरे नाशिकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर
* आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि शहरात सुरू असलेल्या विकास कामासंदर्भात राज ठाकरे काय बोलणार, याकडे लक्ष
* अनेक पदाधिकारी मनसेत प्रवेश करणार
* राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा
- नागपूरच्या युवा डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू.
- मृत डॉक्टरचे नाव डॉ. खुशी पवन मुंधडा (रा.शिवाजीनगर, नागपूर) असून त्या एमएसचे शिक्षण घेत होती.
- एमबीबीएसनंतर त्यांनी सांगलीतील भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता.
अवैध गुटखा वाहतूकीवर पोलिसांनी पंढरपुरात कारवाई केली.
कारवाई दरम्यान 4 लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांविरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका कार गाडीतून अवैध गुटख्याची वाहतूक केली जात होती.
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन म्हसळा मार्गावरील बोडणी घाटात सिमेंट मिक्सरचा अपघात झाला आहे. तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून मिक्सर रस्ता सोडून उलटला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अमरावतीच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शाखा व्यवस्थापकासह अन्य कर्मचाऱ्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल..
मुख्य आरोपी तथा शाखा व्यवस्थापक शुभम वासेवाय याला अटक...
प्राथमिक अंदाजानुसार दीड कोटीच्या वर अपहार झाल्याची शक्यता
बोगस सोयाबीन कंपणीचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांची माहिती
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.