Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : चौकशीसाठी आणलेल्या संशयिताचे पोलीस ठाण्यातून पलायन; सिनेस्टाईल पाठलाग पकडले

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या एका संशयीताने पोलिसांची नजर चुकवत थेट पोलीस स्टेशनमधूनच पळ काढला. यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाल्याचे पहावयास मिळाले. सिनेस्टाइल पाठलाग मारणारा पोलिसांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

नंदुरबारमध्ये (Nandurbar) वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलीसांनी एका संशयीताला चौकशीसाठी आणले होते. मात्र पोलीसांचा गाफीलपणा पाहून या संशयीताने थेट पोलीस ठाण्यातुनच पळ काढला. संशयित पळून गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला गाठण्यासाठी तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांनी सिनेस्टाईल रस्त्यावरुन त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. या घटनेत एक (Police) पोलीस कर्मचारी देखील जखमी झाला आहे. 

संशयीत कुठल्याही गुन्ह्यात अटक नव्हता. मात्र जर संशयीत (Nandurbar Police) पोलीस ठाण्यातून पोबारा करत असेल आणि त्याला पकडण्यासाठी पोलीसांना दमछाक करावा लागत असेल, तर या घटनेवरुन नंदुरबार पोलीसांवर नाराजीचा सुर देखील व्यक्त होता. विशेष म्हणजे ही घटना माध्यमकर्मींसमोर सुरु असल्याने त्यांनी याचे चित्रण घेतल्याचा रागही काही पोलीस कर्मचाऱ्यांचा आल्याने त्यांनी माध्यम कर्मींचा मोबाईल हिसकवण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचा कारभाराचे वाभाडे निघत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या सर्व गणपतींचे विसर्जन

Maharashtra News Live Updates: वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे याचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

Nashik Tourist Places : अविस्मरणीय क्षणांचा अनुभव घ्यायचाय? नाशिकच्या 'या' ५ प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट

Womens T20 World Cup 2024 : टी२० वर्ल्डकपचं वेळापत्रक अचानक बदललं, आता IND W Vs PAK W कधी भिडणार? जाणून घ्या

Samsung Galaxy F05: वा! एक नंबर; दूरवरचा फोटोही येईल खास; स्वस्तातील स्टायलिश मोबाईल फोन लॉन्च

SCROLL FOR NEXT