Shrirampur News
Shrirampur NewsSaam tv

Shrirampur News : श्रीरामपूरमध्ये आज कडकडीत बंद; जिल्हा करावा करण्याच्या मागणीसाठी बंद

Ahmednagar News : राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करावे. तसेच श्रीरामपूर हा नवीन जिल्हा करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून येथील शहरवासीयांची आहे
Published on

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करावा; या मागणीसाठी आज श्रीरामपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. शहरात पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि व्यापारी सहभागी झाले आहेत. यामुळे आज सकाळपासूनच मार्केटमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. 

Shrirampur News
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींसाठी १०० रुपयांमध्ये उघडणार खाते; धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पुढाकार

राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे विभाजन करावे. तसेच श्रीरामपूर हा नवीन जिल्हा करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून येथील शहरवासीयांची आहे. त्यासाठी शेकडो आंदोलन देखील आजवर करण्यात आली आहेत. या दरम्यान जिल्हा नामांतराची घोषणा झाली आहे. मात्र जिल्हा विभाजनाचा प्रश्न अजूनही शासन दरबारी खितपत पडला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा श्रीरामपूर (Shrirampur) जिल्हा व्हावा हि मागणी जोर धरताना दिसत आहे. 

Shrirampur News
Buldhana Cyber Crime : शेअर मार्केटच्या नावाखाली १० लाखात फसवणूक; सायबर पोलिसांनी संशयिताला गुजरातमधून केली अटक

याच मागणीसाठी आज जिल्हा कृती समीतीने शहर बंदची हाक देण्यात आली होती. शहरात पुकारलेल्या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी देखील शंभर टक्के प्रतिसाद देत आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. परिणामी सकाळपासून एक देखील दुकान अद्याप उघडण्यात आलेले नाही. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com