Nandurbar ZP 
महाराष्ट्र

नंदुरबार जिल्‍हा परिषदेत उपाध्‍यक्षपद शिवसेनेला; २५ ऑक्‍टोंबरला निवड

नंदुरबार जिल्‍हा परिषदेत उपाध्‍यक्षपद शिवसेनेला; २५ ऑक्‍टोंबरला निवड

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये सध्या शिवसेना काँग्रेसची सत्ता आहे, अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे; तर उपाध्यक्ष पद शिवसेनेकडे परत येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि दोन विषय समिती सभापती पदांची निवडणूक २५ ऑक्टोबरला पार पडणार आहे. (nandurbar-news-Shiv-Sena-Vice-President-in-Nandurbar-Zilla-Parishad)

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणामुळे ११ सदस्य अपात्र ठरले होते. यामध्ये सर्वाधिक ७ जागा भाजपला गमवाव्या लागल्या होत्या. रद्द झालेल्या पदांसाठी आयोगाकडून खुल्या प्रवर्गासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना- काँग्रेसची सत्ता कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विषय समितीसाठी भाजप, राष्‍ट्रवादीचाही दावा

दरम्यान रद्द झालेल्या पदांपैकी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि दोन विषय समिती सभापती पदाची निवडणूक २५ ऑक्टोबरला होणार आहे. पोट निवडणुकीत भाजपाला ३ जागा गमवाव्या लागल्याने सभापती पदापासून दूर राहावे लागणार असल्याची शक्यता आहे. तर शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य पद वाढल्याने शिवसेनेकडे उपाध्यक्ष पद व एक सभापतीपद व काँग्रेसकडे दोन सभापती पद निवडून येण्याची चर्चा रंगली आहे. तर विषय समिती सभापती पदांसाठी राष्ट्रवादी आणि भाजपने देखील दावा केल्याने जिल्हा परिषदेचे गणित नेमके कसे राहील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान २५ ऑक्टोबरला होणाऱ्या उपाध्यक्ष व विषय समिती सभापतिपद निवडीसाठी पिठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेतील पक्षनिहाय बलाबल

काँग्रेस २४ सदस्य

भाजप २० सदस्य

शिवसेना ०८ सदस्य

राष्ट्रवादी ०४ सदस्य - एक सदस्य मयत फक्त ०३

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT