हिंगाेली : पवार कुटुंबियांवर हाेणारे आराेपबाबत कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. याच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आमदार रोहित पवारांनी भाजपवर सडकून टीका करत राज्यातील शेतकरी अडचणीत असताना केंद्र सरकार राज्याचे पैसे थकीत ठेऊन शेतकऱ्यांना आणखीन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नमूद केले.
आमदार राेहित पवार म्हणाले कोणतेही पुरावे नसताना ईडी, सीबीआय, आयटी विभाग दबावापोटी पवार कुटुंबियांच्या घरी व विविध कंपन्यांवर कार्यवाही करत आहे. या चौकशीत काय पुढे आले याची माहिती स्वतः ईडीचे प्रवक्ते म्हणवून घेणारे देतीलच तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शेतकऱ्यांना धीर द्या असा सल्ला कार्यकर्त्यांना देत त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खोचक टीका केली.
आमदार रोहित पवार हे हिंगोलीच्या औंढा शहरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आले होते. या वेळी त्यांनी हे मत व्यक्त केले.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.