Sarangkheda Chetak Festival Saamtv
महाराष्ट्र

Chetak Festival 2023: पांढरा शुभ्र रंग, देशातील सर्वात उंच घोडी... बरेलीची राधा 'चेतक फेस्टिवलचे' मुख्य आकर्षण; किंमत ऐकून व्हाल अवाक

Sarangkheda Chetak Festival: अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेड्यात घोड्यांचा बाजार भरला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे घोडे आणले जातात. अवघ्या १५ दिवसांत १० ते १२ कोटींची उलाढाल होणारा हा घोड्यांचा बाजार देशभरात प्रसिद्ध आहे.

Gangappa Pujari

सागर निकवाडे, नंदुरबार|ता. २२ डिसेंबर २०२३

Saranghkheda Chetak Festival 2023:

अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेड्यात घोडे बाजार सुरू झाला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे घोडे दाखल होतात. अवघ्या १५ दिवसात १० ते १२ कोटींची उलाढाल होणारा हा घोडेबाजार देशभरात प्रसिद्ध आहे. यंदा उत्तर प्रदेश बरेली येथील राधा घोडी या बाजाराचे मुख्य आकर्षण ठरत आहे. काय आहे या घोडीची खासियत जाणून घ्या.

उत्तरप्रदेशच्या राधाची चर्चा...

सारंगखेडा घोडे बाजारात दाखल झालेल्या उत्तर प्रदेशच्या बरेली येथील राधा घोडीची चर्चा आहे. तिची अदा, सौंदर्य, तिची चाल आणि रुबाबामुळे ही घोडी या बाजाराचे मुख्य आकर्षण ठरत आहे. म्हणूनच राधा घोडीची किंंमत तब्बल १ कोटी इतकी आहे. आतापर्यंत 70 लाखापर्यंत तिची बोली लागली आहे. मात्र मालकाला ही घोडी विकायची नाही, कारण ती जातिवंत असल्याने ती त्यांच्या अश्वशाळेत अश्वपैदास करण्यासाठी आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न जास्त असल्याचे ते सांगतात.

काय आहे राधा घोडीची खासियत?

उत्तरप्रदेशच्या बरेली येथील नजीम भाई यांच्या आर एस अश्व शाळेतील ही घोड असून तिची उंची ७२ इंच इतकी आहे. देशभरात होणाऱ्या अश्व स्पर्धेसाठी ती जात असते. राधा ही देशातील सर्वात उंच घोडी असल्याचा दावा तिच्या मालकांनी केला आहे. ही मारवाड जातीची घोडी असून पांढरी शुभ्र रंगाची आहे. तिला दिवसाला 7 लिटर दुध तसेच मका, राईचे तेल बदाम गावरान अंडी दिले जात असतात. तिची देखभाल करण्यासाठी ३ जण तैनात असतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मध्यप्रदेशच्या गब्बरनेही वेधले लक्ष!

दरम्यान, या राधा घोडीसोबत बाजारात अजूनही काही आकर्षक अश्व दाखल झाले आहेत. ज्यामध्ये मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) गब्बरचाही समावेश आहे. मध्यप्रदेश मधील उज्जैन येथील दिपक जैन यांच्या मालकीचा हा अश्व पंजाबी नुकरा जातीचा आहे. याची किंमत मालकाने ११ लाख ठेवली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT