Aadhar card 
महाराष्ट्र

बनावट आधार कार्डआधारे प्लॉट हडप

बनावट आधार कार्डआधारे प्लॉट हडप

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार : बनावट आधार कार्ड (Aadhar Card) बनवून त्या नावाच्या व्यक्तिच्या जागेवर रजिष्टर कार्यालयात दुसराच व्यक्ती हजर करून नंदुरबार (Nandurbar) शिवारातील प्लॉटची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून एका महिलेची फसवणूक केली. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिस (Police) ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (nandurbar-news-Plot-grabbing-based-on-fake-Aadhaar-card)

सध्या भागापूर (ब्राह्मणपुरी, ता. शहादा) येथे राहणाऱ्या मनीषा चेतन अहिरे यांचे आजोबा पुंजाराम राघो यांच्या नावे नंदुरबार शिवारात हेमंतनगर प्लॉट आहे. भोणे (ता. नंदुरबार) येथील फकिरा जाधव, अनिता भावसार, संगीता भावसार (रा. दोंडाईचा), जगदीश चित्रकथे (खापर), भरत रघुवंशी व मृगेश शिंत्रे (रा. नंदुरबार) या सहा जणांनी संगनमत करून पुंजाराम राघो यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड तयार केले.

कार्डनुसार दुसराच व्‍यक्‍ती केला उभा

कार्डनुसार दुय्यम निंबधक कार्यालयात फकिरा जाधव यांना पुंजाराम राघो यांच्या जागेवर उभे केले व ते पुंजाराम राघो असल्याचे भासवून प्लॉटची खरेदी -विक्रीचा व्यवहार करून प्लॉट हडप केला. ही बाब मनीषा अहिरे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT