नंदुरबार : ४९१ गावात गावठाणाची ड्रोनद्वारे सर्वेक्षण

नंदुरबार : ४९१ गावात गावठाणाची ड्रोनद्वारे सर्वेक्षण
Drone survey
Drone survey
Published On

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण केले जाणार असून ड्रोनद्वारे सर्वेक्षणांचे महत्व, फायदे, कार्यपध्दतीच्या माहितीची जनजागृती करण्यात येत आहे. ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा शुभांरभ अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील वाण्याविहीर येथे आज संपन्न झाला. (Nandurbar-news-Drone-survey-of-villages-in-491-villages)

Drone survey
ओबीसी आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारची मानसिकताच नाही; याचिकाकर्त्यांचा सरकारवर आरोप

राज्य शासनाचा महसूल, ग्रामविकास, भूमी अभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग, डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सर्व गावांतील गावठाणांचे ड्रोनद्वारे भूमापनाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाची माहिती भूमापन अधिकाऱ्यांच्या नियोजनानुसार ग्रामसेवकांनी भूमापन अधिकारी किंवा भूकरमापक यांच्या मदतीने ग्रामसभा आयोजित करुन सर्वेक्षणाचे महत्व, फायदे, भूमापन करण्याची कार्यपध्दती, सिंमांकनाचे महत्व इत्यादीची माहिती सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांना द्यावी. नागरिकांनीही सर्वेक्षणासाठी यंत्रणेला सहकार्य करावे असे आव्हान भूमी अभिलेख विभागाच्या जिल्हा अधीक्षक स्वाती लोंढे यांनी केले आहे.

४९ गावात सर्वेक्षण

ड्रोन गावठाण सर्वेक्षण भूमापनासाठी जिल्ह्यातून ४९१ गावे पात्र असून नंदुरबार तालुक्यात १३६, नवापूर १०३, शहादा १३४, तळोदा ७३, अक्कलकुवा ४४ आणि अक्राणी तालुक्यात १ असे एकूण ४९१ गावांमध्ये प्राथमिक स्वरूपात ड्रोनद्वारे गावठाणाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत महसूलात होवू शकते वाढ

ड्रोनद्वारे सर्वेक्षणांचे ग्रामपंचायतींना होणारे फायदे गावठाणातील प्रत्येक मिळकतीचे मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक तयार होईल. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. त्यामुळे नियोजन करण्यास सोय व सुलभता निर्माण होईल. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता मालमत्ताकराच्या व्याप्तीत येतील. त्यामुळे ग्रामपंचायत महसूलात वाढ होईल. ग्रामपंचायतकडील मालमत्ता कर निर्धारणपत्रक (नमुना 8 नोंदवही )आपोआप, स्वयंचलनाने तयार होईल. हस्तांतरणाच्या नोंदी अद्ययावतकरणे सहज, पारदर्शक व सुलभतेने होईल. गावठाणाचे हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत, शासनाच्या मिळकती व सार्वजनिक मिळकती, जागा तसेच प्रत्येक मिळकतीच्या सिमा व क्षेत्र निश्चित होतील. जनतेस माहितीसाठी उपलब्ध होतील यामुळे गावठाणातील मिळकतींचे हद्दी व क्षेत्राचे वाद कमी प्रमाणात होतील.गावातील घरे, रस्ते, शासनाच्या ,ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांचे क्षेत्र व सीमा निश्चित होतील व मिळकतींचा नकाशा यामुळे तयार होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com