Navapur- Pune Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Navapur- Pune Bus Accident : नवापूर- पुणे बसला अपघात; २० प्रवाशी जखमी

Nandurbar News : नवापूर बसस्थानकातून सुटलेली बस धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरून नवापुर, विसरवाडी, चिंचपाडा येथील प्रवासी घेवुन जात कोंडाईबारी घाटात आल्यानंतर उभ्या असलेल्या मालट्रकला मागून जोरदार धडक

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील कोडाईबारी घाटात नवापूर- पुणे बसला दुपारी अपघात झाला. रस्त्यावर पुढे चालत असलेल्या मालवाहू गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात (Accident) झाला. या अपघातात बसमधील २० ते २२ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. चालक मोबाईलवर बोलत (Nandurbar) असल्याने अपघात झाल्याचे बसमधील प्रवाशांनी सांगितले. (Tajya Batmya)

नंदुरबार जिल्यातील नवापूर आगारातून राज्य परिवहन महामंडळाची बस पुणे जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. नवापूर बसस्थानकातून सुटलेली बस धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरून (Navapur) नवापुर, विसरवाडी, चिंचपाडा येथील प्रवासी घेवुन जात कोंडाईबारी घाटात आल्यानंतर उभ्या असलेल्या मालट्रकला मागून जोरदार धडक दिली. दुपारी १ वाजेच्या सुमारास (Bus Accident) हा अपघात झाला आहे. या बसमधील २० ते २२ प्रवासी जबर जखमी झाले आहेत.  

'साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातात जखमी काही प्रवाशांना दहिवेल, साक्री आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी कोंडाईबारी महामार्ग सुरक्षा पोलीस, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे दाखल झाले. त्यांनी ताबडतोब महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. बस चालक मोबाईलवर बोलत असतांना समोर दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमी झालेल्या प्रवाशांनी दिली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mallikarjun Kharge : त्यांनी आमच्याच योजना कॉपी केल्यात, मल्लिकार्जुन खरगेंचा महायुतीवर आरोप

World : जगातील सर्वात लहान वाळवंट पाहिलंय का? हिवाळ्यात होते पर्यटकांची गर्दी

Maharashtra News Live Updates: भास्कर परब यांनी सुनील प्रभू यांच्या एकनिष्ठतेवर उपस्थित केले प्रश्न

Maharashtra Politics: घरातून बाहेर न निघणाऱ्यांना १५०० रुपयांची किंमत काय कळणार? श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना टोला

ना पासवर्ड, ना कोणं App... आता घरबसल्या असा तपासा तुमचा PF बॅलन्स

SCROLL FOR NEXT