Medha Patkar  Saam Tv
महाराष्ट्र

मेधा पाटकर यांनी शाळेच्या नावावर कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप; गुन्हा दाखल

मेधा पाटकर यांच्याविरोधात गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नंदुरबार: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर यांच्यावर पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. बरवानी पोलिसांनी (Police) मेधा पाटकर आणि त्यांच्या एनजीओच्या ११ जणांविरुद्ध पैशांच्या गैरव्यवहारप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. नर्मदाच्या नवनिर्माण अभियान स्वयंसेवी संस्थेने ८४ सामाजिक कार्ये आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केलेल्या रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप मेधा पाटकर यांच्यावर आहे. ती रक्कम विकास प्रकल्पांमध्ये वापरण्याऐवजी विरोधासाठी वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या स्वयंसेवी संस्थेला गेल्या वर्षांत १३ ते १४ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे, तर यासंदर्भात उत्पन्न आणि खर्चाच्या स्रोतांबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. याप्रकरणी प्रीतम बडोले या तरुणाने एफआयआर दाखल केला आहे. "महाराष्ट्रातील नंदुरबार भागात जीवनशाळा नावाची शाळा चालवून मुलांचे भविष्य घडवण्याचे एनजीओला सांगण्यात आले होते, पण प्रत्यक्षात अशी कोणतीही शाळा दिसली नाही, म्हणजे शाळेच्या नावावर मेधा पाटकर आणि त्यांचे सहकारी पैसे उकळत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि वातावरण बिघडवण्यासाठी ते पैशाचा वापर करत आहेत, असा आरोप तक्रारदार प्रीतम बडोले यांनी केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी (Police) तपास सुरू केला आहे. स्वतंत्र टीम मुंबई, नंदुरबारला पाठवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मध्यप्रदेश राज्यातील बडवानी येथील नर्मदा बचाव आंदोलन कार्यालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यासह ११ जणांवर जीवन शाळांच्या नावावर १३ कोटींहून अधिक रक्कमेचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली पोलीस स्टेशन बडवानी येथे दाखल केलेल्या एफआयआरच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली असून, यामध्ये पोलीस विभागीय अधिकारी रुपरेखा यादव नेतृत्व करत आहेत.

नर्मदा नवनिर्माण अभियान ट्रस्ट मुंबई, नंदुरबार, धडगाव आणि बडवाणी येथील नर्मदा बचाव आंदोलन कार्यालयात वेगवेगळी पथके पाठवण्यात आली असून, मुंबईतील नवनिर्माण अभियान ट्रस्ट कार्यालयात कागदपत्रे घेण्यात आली आहेत. तसेच बडवानी येथील नर्मदा बचाव आंदोलन कार्यालयाला नोटीस देण्यात आली आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीपक कुमार शुक्ला यांनी दिली. दुसरीकडे बडवाणी येथील नर्मदा बचाव आंदोलनचे कार्यकर्ते महेंद्र तोमर यांनी पोलीस (Police) विभागाकडून नोटीस आल्याची माहिती देत तपासाला सहकार्य केले जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT