एक संजय तो गया दुसरा जल्द; संजय पांडेंच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांचे सूचक ट्विट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली.
Mohit Kamboj, Sanjay Raut
Mohit Kamboj, Sanjay Raut Saam Tv
Published On

मुंबई: काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कॉ-लोकेशन घोटाळा केल्याप्रकरणी ईडीने ही अटक केली आहे. ( Sanjay Pandey Arrested) तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने संजय राऊतांना (Sanjay Raut ) आज बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमिवर आता भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक सूचक ट्विट केले आहे.

Mohit Kamboj, Sanjay Raut
माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंच्या अटकेनंतर खासदार संजय राऊतांना ईडीचं समन्स

भाजपच्या मोहित कंबोज यांनी आज सकाळी एक सूचक ट्विट केले आहे. 'एक संजय तो गया दुसरा जल्द ….' अस ट्विट मध्ये म्हटले आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची सर्व प्रकरण बाहेर काढण्यात पडद्यामागून मोहित कंबोज यांनी काम केल असल्याची माहिती मिळत आहे, तर दुसरीकडे मुंबईत भाजप विरुध्द शिवसेना नेते अशा टीका सुरू होत्या. यात संजय राऊत यांनी मोहित कंबोज यांच्यावर टीका केल्या होत्या.

मुंबई महापालिकेनेही कंबोज यांच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे आता कंबोज यांचे हे ट्विट शिनसेना नेते संजय राऊत यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे.

Mohit Kamboj, Sanjay Raut
'सुप्रीम' सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष; सर्वोच्च न्यायालयात आज ठरणार शिंदे सरकारचं भवितव्य

संजय राऊतांना ईडीचं समन्स

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. त्यामुळे ईडीने संजय राऊतांना (Sanjay Raut ) उद्या म्हणजे बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहे. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीने याआधी देखील संजय राऊतांची पत्राचाळ प्रकरणी चौकशी केली आहे. (Sanjay Raut News In Marathi )

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीच्या मुंबई कार्यालयाने गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी बुधवारी ११ वाजता चौकशीसाठी समन्स जारी केलं आहे. संजय राऊतांची या घोटाळ्याप्रकरणी याआधी देखील चौकशी ईडीने केली आहे.

आज ईडीने (ED) संजय राऊत यांच्याशी संबंधित प्रकरणात सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची चौकशी केली. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे व्यवसायिक मित्र आहेत. स्वप्ना पाटकर यांच्या नावाने संजय राऊत यांनी अलिबागमधील जमिनीची खरेदी केल्याचा आरोप आहे. तर जमिनीचे ४ प्लॉट हे स्वप्ना पाटकर यांच्या नावे आणि ४ प्लॉट राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर या दोघांची ईडी कार्यालयात सकाळी ११ पासून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता संजय राऊत यांना ईडीने उद्या चौकशीसाठी बोलावलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com