महाराष्ट्र

Nandurbar News: महायुतीचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर; शिंदे गटाला नको भाजपचा उमेदवार

BJP- Shinde Group : आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी महायुतीचा पहिला मेळावा हा घेण्यात आला. या मेळाव्यात महायुतीमध्ये असलेले शिंदे गट यांनी या महायुतीचा मेळावाला दांडी मारल्याने भाजप राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील अंतरिक वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेलं पाहायला मिळालं.

Bharat Jadhav

सागर निकवाडे ,नंदुरबार

Shinde Group vs BJP Nandurbar :

नंदुरबार शहरातील छत्रपती नाट्यगृहात महायुती म्हणजे भाजप- अजित पवार गट आणि शिंदे गट यांचा मेळावा झाला. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत हा महायुतीचा मेळावा पार पडला. मात्र या महायुतीचा मेळाव्याला केवळ राष्ट्रवादी आणि भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. या महायुतीमध्ये असलेले शिंदे गट यांनी या महायुतीचा मेळावाला दांडी मारल्याने भाजप राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील अंतरिक वाद पुन्हा चव्हाट्यावर आलेलं पाहायला मिळालं.(Latest News)

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी महायुतीचा पहिला मेळावा हा घेण्यात आला. मात्र या पहिल्या मेळाव्यात भाजपचे आमदार तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit)त्यांच्यासोबत भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि नंदुरबार लोकसभा खासदार (Lok Sabha MP) आणि येणाऱ्या लोकसभेचे उमेदवार डॉ. हिना गावित (Dr. Hina Gavit) यांनीच या महायुतीच्या पहिल्या मेळावाला दांडी मारल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या दोन टर्न पासून नंदुरबार लोकसभेचे खासदार असलेल्या डॉ. हिना गावित यांची येणाऱ्या लोकसभेसाठी भाजपकडून तिकीट फायनल असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र त्यांच्या या उमेदवारीला त्यांच्याच महायुतीतील एक भाग असलेल्या शिंदे गटाने प्रचंड विरोध केलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे गट (Shinde group) आणि इतर मित्र पक्षांनी नंदुरबार डेव्हलपमेंट फोरम नामक एक कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या हिना गावित यांचावर टीका करत आम्हाला टोल घेणाऱ्या खासदाराला आमचा विरोध असून टोलमुक्त जिल्हा करणारा खासदार पाहिजे असल्याचं त्यांनी सांगितलं. आमचा भाजपला विरोध नाही पण सध्याचे खासदार आणि मंत्री विजयकुमार गावित यांच्या कन्या यांचा आम्हाला विरोध विरोध असल्याने त्यांना लोकसभेचे तिकीट देऊ नये, भाजपने उमेदवार बदलून द्यावा अशी ही मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मंत्री विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभेतून निवडून आल्यानंतर त्यांना आदिवासी विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली. नंतर त्यांची कन्या डॉ. हिना गावित हे स्वतः खासदार आहेत आणि त्यांची दुसरी कन्या डॉ. सुप्रिया गावित हे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. गावित परिवाराच्या या परिवार वादाला आता प्रचंड विरोध होत असून येणाऱ्या लोकसभेत भाजपच्या उमेदवार हिना गावित यांना मित्रपक्ष किती मदत करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT