Rajendra Kumar Gavit  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेआधी भाजपला तगडा झटका! राजेंद्रकुमार गावितांचं अखेर ठरलं, काँग्रेसशी 'हात'मिळवणी!

Rajendra Kumar Gavit: भाजपमधून बाहेर पडल्यानंतर राजेंद्र गावित कोणत्या पक्षासोबत जाणार याबद्दल चर्चा होत होती. अखेर त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला असून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Priya More

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला नंदुरबारमध्ये मोठा झटका मिळाला आहे. मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर राजेंद्र गावित कोणत्या पक्षासोबत जाणार याबद्दल चर्चा होत होती. अखेर त्यांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. राजेंद्र गावित काँग्रेससोबत गेल्यामुळे आता नंदुरबारमध्ये भाजपचे टेन्शन वाढले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र गावित हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देताना आगामी विधानसभेत शहादा-तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. आता ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे ते काँग्रेसच्या तिकीटावर ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस इच्छुकाच्या मुलाखतीसाठी राजेंद्र गावित उपस्थित होते. राजेंद्र गावित हे भाजपला रामराम केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून शहादा तळोदा मतदारसंघ निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. राजेंद्र गावित काँग्रेसमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने आमदार राजेश पाडवी यांची डोकेदुखी वाढणार आहे. शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघात एकापाठोपाठ एक भाजपाला मोठे धक्के बसत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमधून इच्छुकांची मोठी संख्या आहे.

दरम्यान, राजेंद्र गावित विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र भाजप तिकीट देणार नसल्याची त्यांना खात्री झाल्यानंतर गावित यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजेंद्र गावित यांनी २०२४ची विधानसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना २०१९ मध्ये भाजपकडून तिकीट मिळेल अशी आशा होता. पण भाजपने राजेंद्र पाडवींना तिकीट दिलं. सध्या शहदा-तळोदा विधानसभा मतदारसंघामध्ये राजेंद्र पाडवी आमदार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

Suraj Chavan: 'मला वेड लावलयं...'म्हणतं रितेश भाऊंच्या गाण्यावर गुलीगत सूरजनं धरला ठेका, Video पाहा

SCROLL FOR NEXT