Voting Awareness Saam tv
महाराष्ट्र

Voting Awareness : मतदान जनजागृतीसाठी गुरुजी बनले वासुदेव; भक्तीगीतांच्या माध्यमातून पटवताय मतदानाचे महत्त्व

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पुढील आठवड्यात नंदुरबार लोकसभेसाठी मतदान होणार आहे. (Nandurbar) यामुळे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वतः पुढाकार घेत जनजागृती करण्यास सुरवात केली आहे. जनजागृतीसाठी त्यांनी वासुदेवाची वेशभूषा करत फिरत आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा; यासाठी शासन स्तरावर (Lok Sabha Election) अनेक प्रयत्न केले जात असतात. त्यातही नवनवीन प्रयोग मतदान जनजागृती केली जात असतात. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा (Taloda) तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक असलेले कैलास लोहार हे मतदान जनजागृतीसाठी वासुदेवाची वेशभूषा साकारली असून ते तळोदा शहरातील बसस्थानक, संविधान चौक यासोबतच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर जाऊन भक्तीगीतांच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देत आहेत. 

याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, जनमनाची एक पुकार मतदान आपला अधिकार, चला मतदान करूया यासारख्या अनेक घोषवाक्यांवर गीत म्हणून ते उपस्थित लोकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. कैलास लोहार यांची वेशभूषा पाहून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटले असून लोक त्यांना पैसे आणि धान्य देत असल्याने मतदान ही श्रेष्ठदान असल्याचे सांगत मतदान जनजागृती करताना सध्या पाहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT