Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार- नवापूर दरम्यान महामार्गावरील वाहतूक ९ दिवस बंद; रेल्वे रुळ दुरुस्तीच्या कामामुळे गेट बंद

Nandurbar news : नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहन गुजरात राज्यात ये- जा करीत असतात. मात्र चिंचपाडा ते कोळदा दरम्यान रेल्वे रुळ दुरुस्तीच्या काम सुरु आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर असलेल्या नवापूरपासून गुजरातमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. या महामार्ग दरम्यान चिंचपाडा ते कोळदा ;अशा रेल्वे लाईनवर फाटक आहे. दरम्यान या रेल्वे लाईनच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे सदरचे रेल्वे गेट बंद असल्याने महामार्गावरील वाहतूक देखील पुढील ९ दिवसांसाठी बंद राहणार आहे.    

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वाहन गुजरात राज्यात ये- जा करीत असतात. मात्र चिंचपाडा ते कोळदा दरम्यान रेल्वे रुळ दुरुस्तीच्या काम सुरु आहे. तसेच याठिकाणी दुसऱ्या रेल्वे लाईन टाकण्याचे काम देखील सुरु आहे. यामुळे नंदुरबार ते नवापूर (Navapur) मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर ७४ चिंचपाडा ते कोळदा या मार्गावरील वाहतुक ९ ऑगस्ट बंद करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश दिले आहे. 

वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली 

रेल्वे लाईन दुरुस्तीच्या कामाला सुरवात करण्यात येणार असल्याने या मार्गावरील पर्यायी वाहतूक उच्च्छल- धानोरा मार्गे नंदुरबारकडे व नंदुरबारकडून गुजरात राज्याकडे जाणारी वाहने त्याच मार्गे जातील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

SCROLL FOR NEXT