नंदुरबार : पोलिस असल्याची बतावणी करत आम्ही गांजा तस्करांची तपासणी करीत आहोत, असे सांगून वृद्ध व्यापाऱ्याकडील मौल्यवान वस्तू रूमालमध्ये बांधण्याचे सांगत त्याचवेळी हातचलाखी करीत तोतया पोलिसाने ३५ हजारांच्या सोन्याचा अंगठ्या घेऊन पसार झाल्याची घटना शहरात काही दिवसांपूर्वी घडली. मात्र संबंधित व्यापाऱ्याने भीतीपोटी कोणालाही सांगितले नाही. मात्र रविवारी (ता. २१) त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्याने तया पोलिसाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (nandurbar-news-fraud-police-of-crime-branch-name-of-investigation-The-old-merchant-was-devastated)
वीस दिवसांपुर्वी २ नोव्हेंबरला धनत्रयोदशीच्या दिवशी शहरातील व्यापारी मानकचंद चितलांगे (वय ७५, रा. विद्यानगरी, धुळे रोड ,नंदुरबार) खतावणी वही खरेदीसाठी जात असताना देसाईपुरा परिसरातील पृष्टीभाग मंदिरासमोर एका अनोळखी व्यक्तीने मोटारसायकलवरून नमस्कार केल्याने श्री. चितलांगे थांबले. तेव्हा त्या व्यक्तीने ओळखपत्रासारखे काहीतरी दाखवून, आम्ही क्राइम ब्रँचचे पोलिस असून, रात्री दोन लाखाचा गांजा पकडला आहे. त्यामुळे तपासणी सुरू असून, अंगावरील मौल्यवान वस्तू रूमालामध्ये ठेवा, असे सांगितले. त्यामुळे श्री. चितलांगे यांनी त्यांच्या रूमालात दोन सोन्याच्या अंगठ्या, डायरी, मोबाईल व पैसे ठेवले.
वस्तू न वापरायचा सल्ला
त्या अनोळखी व्यक्तीने सगळ्या वस्तू रूमालमध्ये बांधून श्री. चितलांगे यांच्याकडे परत दिले. दोन दिवस मौल्यवान वस्तू घालून फिरू नका, असा सल्लाही दिला. त्यामुळे श्री. चितलांगे तेथून दामोदर प्रिटींग प्रेसमध्ये वह्या घेण्यासाठी गेले. तेथे त्यांनी रुमालात बांधलेल्या वस्तू सोडून पाहिले असता त्यात बाकी वस्तू दिसल्या. परंतु दोन सोन्याच्या अंगठ्या नव्हत्या. त्यांना वाटले की सोन्याच्या अंगठ्या खाली पडल्या असतील, म्हणून दुकानात जाऊन शोधल्या असत्या मिळाल्या नाहीत.
पुन्हा चौकशीत फसविण्याची भिती
त्यांची एक सात ग्रॅम व दुसरी आठ ग्रॅम असे १५ ग्रॅम वजनाच्या ३५ हजारांच्या सोन्याचा अंगठ्या तोतया पोलिसाने लांबविल्याची खात्री झाली. मात्र संबंधिताने चौकशी सुरू असल्याचे भासविल्याने आपल्याला पुन्हा चौकशीत ते फसवतील की काय, या भीतीने श्री. चितलांगे यांनी २० दिवसांनंतर कुटुंबीयांना घडलेली हकिगत सांगितली. त्यानंतर आज नंदुरबार शहर पोलिसांत त्यांनी फिर्याद दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.