Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत बिघाडी; अजित पवार गटाकडून उमेदवार उभा राहण्याच्या तयारीत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यभरात विधानसभा निवडणुकसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून तयारीला सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात देखील चित्र आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजप आमदार असलेल्या मतदार संघात अजित पवार गटाकडील उमेदवार देखील रिंगणात उभा राहण्याच्या तयारीत आहे. 

विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम कधीही लागण्याची शक्यता आहे. दरम्यान ऐन निवडणुकीच्या तोंडावर (Nandurbar News) नंदुरबार जिल्ह्यातील शहादा- तळोदा मतदार संघात महायुतीत बंड होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्या मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे हे देखील उमेदवारी करणार असल्याचे समोर आले आहे. मोहन शेवाळे यांनी तळोदा (Taloda) तालुक्यातील बोरद येथून जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. ही जनसंवाद यात्रेत मोहन शेवाळे हे तळोदा तालुक्यासह शहादा तालुक्यातील नागरिकांशी संपर्क साधणार आहे. 

त्यावेळी भूमिका स्पष्ट करणार 

तळोदा तालुक्यातील नागरिकांना स्थानिक आमदार पाहिजे व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार निवडणूक लढणार आहे; अशी प्रतिक्रिया मोहन शेवाळे यांनी दिली आहे. महायुतीत ही जागा भाजपाला सुटल्यास आम्ही तेव्हा आमची भूमिका स्पष्ट करू; असे वक्तव्य देखील शेवाळे यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Fire: खामगाव शहराजवळील श्रीहरी लॉनला भीषण आग; सर्वत्र पसरल्या आगीच्या ज्वाळा

Akshay Shinde: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? ७ तास चाललेल्या पोस्टमॉर्टममधून सत्य आलं बाहेर

Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेच्या चकमक प्रकरणी, कुटुंबियांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Akshay Shinde Encounter: एन्काऊंटर की कायद्याच्या चिंधड्या? अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधकांची 'फायरिंग', मित्रपक्षाकडूनही महायुतीची कोंडी

Assembly Election: जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून आता भाजपमध्येच रस्सीखेच सुरू; माजी नगरसेविकेनंतर आता जिल्हाध्यक्षांना हवी उमेदवारी

SCROLL FOR NEXT