Shahada News Saam tv
महाराष्ट्र

Shahada News : शहादा नगरपालिका शाळेची जीर्ण इमारत पडण्याच्या मार्गावर; ९५० विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

Shahada News : शहादा नगरपालिकेची न्यू इंग्लिश शाळा ही जुनी असून १९१३ साली या शाळेची स्थापना करण्यात आली.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या न्यू इंग्लिश शाळेची इमारत ही जीर्ण झाली आहे. शाळेच्या स्लॅबचे तार देखील आता बाहेर यायला लागले असून धोकादायक असलेल्या शाळेच्या जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या इमारती कधी कोसळतील याची भरोसा नसून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. 

शहादा (Shahada) नगरपालिकेची न्यू इंग्लिश शाळा ही जुनी असून १९१३ साली या शाळेची स्थापना करण्यात आली. मात्र अनेक वर्ष उलटून देखील या शाळेची दुरुस्ती न केल्यामुळे ही शाळा धोकादायक स्थितीत आली आहे. शाळेच्या भिंती कधी कोसळतील हे सांगता येणार नाही. या शाळेची (School) इमारत जीर्ण झाली असून स्लॅबचे पूर्ण तार आहेत बाहेर आले असून अनेक खिडक्यामधून काच बाहेर आहेत. या जीर्ण झालेल्या इमारतीबद्दल अनेक तक्रारी आणि पाठपुरवठा करून देखील पालिकेच्यावतीने काहीही दुरुस्ती केली जात नसल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक आर. पी. वसावे यांनी दिली.

९५० विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात 
या न्यू इंग्लिश शाळेत ५ ते १२ वी पर्यंतचे शिक्षण असून गरीब कुटुंबातील एकूण ९५० विद्यार्थी या ठिकाणी आपला जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. शहादा नगरपालिकेला शाळेत संदर्भात अधिक तक्रारी देऊन देखील नगरपालिका प्रशासन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे. शाळेची कुठल्याही प्रकारची दुरुस्ती या ठिकाणी केली जात नसून नगरपालिका आहे. ९५० विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतोय की काय असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

Devendra Fadnavis: अनंत चतुर्थीदशीला सीएम देवेंद्र फडणवीसांचा जनतेला संदेश; म्हणाले.. |VIDEO

Multani Mitti : काळेभोर चमकदार केस हवेत? मग वापरा फक्त मुलतानी माती

SCROLL FOR NEXT