Primary School Time : चौथीपर्यंतच्या शाळा आता ९ वाजेनंतर भरणार; शिक्षण विभागाने काढले आदेश

Sambhajinagar News : राज्यातील बहुतेक शाळा या सकाळी ७ किंवा ८ वाजता भरविण्यात येत असतात. त्यामुळे शाळेच्या वेळेच्या आधी लहान मुलांना किमान १ ते २ तास आधी तयारी करावी लागते
Primary School Time
Primary School TimeSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागत असते. पहिलीच्या वर्गापासूनच सकाळी ७ किंवा ८ वाजता शाळा भरविली जात असते. मात्र शिक्षण विभागाने आदेश काढत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजेनंतर भरविण्याचे आदेश काढले आहेत. यामुळे लहान मुलांची झोपमोड आता थांबणार आहे.

Primary School Time
Maharashtra Politics: भाजपची दोरी फडणवीसांच्याच हाती; फडणवीस राजकीय चिखलातून 'कमळ' फुलवणार?

राज्यातील बहुतेक शाळा (School) या सकाळी ७ किंवा ८ वाजता भरविण्यात येत असतात. त्यामुळे शाळेच्या वेळेच्या आधी लहान मुलांना किमान १ ते २ तास आधी तयारी करावी लागते. परिणामी लहान मुलांना सकाळी ६ वाजेपूर्वी उठावे लागत असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही. काही महिन्यांपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी देखील  हा मुद्दा उपस्थित करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाला (Education Department) केल्या होत्या.  

Primary School Time
Sambhajinagar News : मोकाट कुत्र्यांचा तरुणीवर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

आता शाळेच्या वेळेबाबत शिक्षण विभागाने निर्णय घेत छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंत शाळा सकाळी नऊ वाजेपर्यंत भरविण्याबाबतचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची झोपमोड आता थांबणार असून त्यांना दिलासा मिळाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com