Shahada News Saam tv
महाराष्ट्र

Shahada News : चक्रीवादळाचा शहादा तालुक्याला तडाखा; २५० घरांचे नुकसान, पत्रा उडून लागल्याने पती- पत्नी जखमी

Nandurbar News : नंदुरबारमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास एक ते दीड तास जोरदार पावसाने झोडपुन काढले आहे. यात अनेक घरांचे पत्रे उडाले असून अनेक घरांची मोडतोड देखील झाल्याचं दिसून येत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदुरबार
: नंदुरबार जिल्ह्यात सोमवार सायंकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाने शहादा तालुक्यात मोठ्या नुकसानीचा अंदाज समोर येत आहे. शिवाय काल झालेल्या चक्रीवादळामुळे घरांची पडझड झाली आहे. साधारण २०० ते २५० घरांचे यात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान सोनवल गावात घराचा पत्रा उडून लागल्याने पती पत्नी जखमी झाले आहेत. 

नंदुरबारमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास एक ते दीड तास जोरदार पावसाने झोडपुन काढले आहे. यात अनेक घरांचे पत्रे उडाले असून अनेक घरांची मोडतोड देखील झाल्याचं दिसून येत आहे. तर शहादा तालुक्यातील मंदाना, असलोद, सोनवल, काथरदा या गावात अनेक घरांची पडझड झाली असून अवकाळीच्या तडाख्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब देखील पडल्याचे समोर आले आहे. यामुळे वोज पुरवठा खंडित झाला आहे. 

गोठा पडल्याने सहा जनावरे जखमी 

काल सायंकाळपासून झालेल्या पावसात शहादा तालुक्यातील ३२८ घरांची अंशतः पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. तर कालच्या पातळी पावसात सोनवल येथे एक गोठा पडून सहा जनावर जखमी झाल्याचं देखील समोर आले आहे. शहादा तालुक्यातील सोनवल गावात घराचा पत्रा उडून एक इसम देखील जखमी झाला असून त्याच्यावरती शहादा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

भंडाऱ्यात मळणी झालेले भातपीक ओलं

भंडारा : भंडाऱ्यात मागील चार दिवसात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले भातपीक सापडले. अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेला भातपीक मळणीसाठी शेतात ठेवला होता तो पाण्याखाली आला. तर तुमसर तालुक्यात भात पीक कापणीला आलेला असताना सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसात भातपीक अक्षरश: शेतात भुईसपाट झाले. अनेक शेतकऱ्यांचे मळणी केलेले भातपीक अचानक आलेल्या बेमोसमी पावसात ओलचिंब झालं. काहींचं भातपीक पाण्याखाली सडायला आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT