Heavy Rain : बुलढाण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; पुरात वृद्ध गेला वाहून, बीड जिल्ह्यातही पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Buldhana Beed News : गेल्या सात दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान काल सायंकाळी खामगाव तालुक्यातील घारोड गाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. या पावसाने घारोड नदीला पूर आला
Heavy Rain
Heavy RainSaam tv
Published On

संजय जाधव/ योगेश काशीद 

बुलढाणा/ बीड : राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नदी, नाल्यांना पूर आले आहेत. दरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे नदीला आलेल्या पुरात घारोड गावातील ७८ वर्षीय वृद्ध पुरात वाहून गेल्याची घटना घडली. तसेच बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झालेल्या ओढ्याला आलेल्या पुरात एक शेतकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे. 

घारोड नदीच्या पुरात वृद्ध वाहून गेला 

गेल्या सात दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान काल सायंकाळी खामगाव तालुक्यातील घारोड गाव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. या पावसाने घारोड नदीला पूर आला होता. यावेळी घारोड गावातील ७० वर्षीय शेतमजूर धोंडिबा इंगळे हे घरी परतत असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाला रात्रीच देण्यात आली होती. मात्र आद्यपपर्यंत प्रशासनाचा कुठलाही अधिकारी किंवा एनडीआरएफची टीम गावात पोहोचली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Heavy Rain
Shocking Video: भयंकर! ब्रिजवरून तारेवर लटकला आणि थेट रेल्वे रूळांवर कोसळला; थरार पाहून हादराल

बीड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस 

बीड : बीड जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून अति मुसळधार पावसामुळे नदी, नाले व ओसंडून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शिवाय कालच्या पावसामुळे शेतात देखील पाणी साचले असल्याने शेतीची कामे रखडली आहेत. 

Heavy Rain
Lonavala Crime : लोणावळ्यात दरोड्याचा थरार; डॉक्टर कुटुंबासह वाचमनला बांधून टाकला दरोडा, १२ लाखाचे दागिन्यासह रोकड लंपास

शेतातून घरी येताना शेतकरी वाहून गेला 

मंगळवारी दुपारनंतर झालेले अति मुसळधार पावसामुळे नदी नाले त्याला पूर आला बीडच्या गेवराई तालुक्यातील टाकळगव्हाण येथील शेतकरी ज्ञानेश्वर सखाराम पराडे हे पुल ओलांडून जात होते. यावेळी पुलावरती आलेल्या पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे ते पाण्यात वाहून गेले. रात्रभर गावकऱ्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह सकाळी आढळून आला. घटनेने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात शेव विच्छेदानासाठी पाठवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com