Lonavala Crime : लोणावळ्यात दरोड्याचा थरार; डॉक्टर कुटुंबासह वाचमनला बांधून टाकला दरोडा, १२ लाखाचे दागिन्यासह रोकड लंपास

Maval News : दरोडेखोरांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा आणि बेडरूमचा दरवाजा फोडून आत प्रवेश करत बंगल्याच्या गॅलरीत झोपलेल्या वाचमन आणि त्याची पत्नी वर्षा यांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधले
Lonavala Crime
Lonavala CrimeSaam tv
Published On

मावळ : पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणावळ्यात एका बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास वीस ते पंचवीस दरोडेखोरांनी घुसून धुडगूस माजवला आहे. डॉक्टर कुटुंबाच्या घरात चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. यावेळी घरातील सर्व सदस्यांसह वाचमनला बांधून ठेवत घरातून सुमारे १२ लाख रुपयांचे दागिन्यांसह रोकड लांबविली आहे. 

लोणावळा येथे रात्रीच्या सुमारास हा थरार घडला आहे. डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल यांच्या ओम श्री बंगला येथे हा दरोडा पडलेला आहे. यात दरोडेखोरांनी थेट तलवार, कुकरी आणि लाकडी दांडक्याच्या साह्याने बंगल्यातील दरवाजे फोडून आत प्रवेश केला. दरोडेखोरांनी बंगल्याचा लोखंडी गेट मुख्य दरवाजा आणि बेडरूमचा दरवाजा फोडून आत प्रवेश करत बंगल्याच्या गॅलरीत झोपलेल्या वाचमन अंबादास रायबोते आणि त्याची पत्नी वर्षा यांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधले आणि तोंडात कापडी बोळा कोंबून हातपाय बांधले. 

Lonavala Crime
Unseasonal Rain : कांद्याला अवकाळीचा सर्वाधिक फटका; नाशिक जिल्ह्यात ३ हजार हेक्टरवरील कांदा मातीमोल

दागिन्यांसह रोकड घेऊन झाले पसार 

दरोडेखोरांनी डॉ. खंडेलवाल व त्याच्या पत्नीला बेडरूममध्ये बांधून ठेवले होते. दरम्यान प्राणघातक हत्यारे दाखवत आवाज केला तर ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर दरोडेखोरांनी कपाटात ठेवलेले बारा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे कडे, दोन बांगड्या, सोन्याची चैन, तुलसी माळ, मंगळसूत्र, देवाचे दागिने, पाच लाखाचा डायमंड सेट आणि पंचवीस हजारांची रोख रक्कम असा एकूण बारा लाख रुपयांचा ऐवज चोरून चोर पसार झाले. 

Lonavala Crime
Bus Fire : धावत्या बसचे टायर फुटून भीषण आग; बसमध्ये होते २५ प्रवासी, जामनेरजवळची भयानक घटना

एकाच घरावर चौथा दरोडा 

दरम्यान रात्रीच्या अंधारात घरातील सर्वांना बांधून ठेवले व बारा लाख रुपयाचे दागिने व रोकड लंपास केले. मुख्य म्हणजे मागील चार वर्षांमध्ये डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर पडलेला हा चौथा दरोडा आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरांचा शोध लोणावळा शहर पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com