जामनेर (जळगाव) : पुण्याहून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या बसमधून जवळपास २५ प्रवासी प्रवास करत जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ धावत्या बसचे टायर फुटले. यानंतर क्षणार्धात बसला आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली होती. यावेळी प्रवाशांनी आरोळ्या मारत जीव वाचविण्यासाठी बसमधून उड्या मारल्या होत्या.
जळगावच्या जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास हि धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी सुमारे पुणे संभाजीनगर मार्गाने बऱ्हाणपूर धारणी येथे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसने पिंपळगाव गोलाईत गावाजवळ अचानक पेट घेतला. बसचे टायर फुटल्याने अचानक धूर निघण्यास सुरवात झाली. बसमधील प्रवाशांच्या सदर बाब लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने चालकाने गाडी थांबवली. त्यावेळेस बसचे मागील टायराने पेट घेतलेला होता.
सर्व प्रवासी सुखरूप बाहेर
दरम्यान बसमध्ये तब्बल २५ प्रवासी होते. चालकाने बस रस्त्याच्या बाजूला उभी करताच प्रवाशांनी खाली उतरले. गाडीतील सर्व प्रवाशांना सामानासह सुखरूप खाली उतरविण्यात आले. त्यानंतर थोड्याच वेळात पूर्ण गाडीने पेट घेतला. यावेळी जोरदार वारा सुरू असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले असता प्रवाशांची धावाधाव केली. काही क्षणातच बस आगीच्या भक्षस्थानी सापडून जळून खाक झाली होती. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
महामार्गावरील वाहतूक ठप्प
दरम्यान स्थानिकांनी जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला घटनेची माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी येत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. सर्व प्रवासी, चालक वाहक सुरक्षित असून मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान पहूर- जामनेर रोडवर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.