Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : दंगलीच्या व्हिडिओसह तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित; नंदूरबारमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल

Nandurbar News : नंदुरबार येथे चार दिवसापूर्वी दोन गटात मोठी दंगल झाली होती. त्यात दंगेखोरांनी पोलिसांना लक्ष केले.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबारमध्ये मागील आठवड्यात दोन गटात दंगल उसळली होती. या दंगलीनंतर जनमानसात पोलीस दलाविषयी अप्रीतीची भावना निर्माण केली. तसेच दोन समाजामध्ये तेढ व भीतीचे वातावरण निर्माण होईल, असा मजकुर व्हॉटसॲप ग्रुपवर प्रसारीत केला. या प्रकरणी नंदुरबार येथील एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार (Nandurbar) येथे चार दिवसापूर्वी दोन गटात मोठी दंगल झाली होती. त्यात दंगेखोरांनी पोलिसांना लक्ष केले. गृह रक्षक दलातील जवान आणि पोलीस कर्मचारी व पोलिस अधिकारी यांच्यासह २३ जण या दंगलीत जखमी झाले होते. तर पोलिसांच्या (Police) वाहनांसह २६ वाहनांचे नुकसान झाले. जाळपोळीमुळे अनेक घरांचे व दुकानांचे देखील नुकसान झाले. दरम्यान या दंगलींनंतर नंदुरबारमध्ये दोन दिवस तणावाचे वातावरण पसरले होते. 

दरम्यान, या दंगली संदर्भात आक्षेपार्ह माहिती प्रसारित करण्यात आली होती. या माहितीबाबत पोलिसांना दिसून आले. त्यावरून त्यांनी कारवाई सुरू केली. अशाच प्रकारे दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचा मजकूर व्हाॅट्स ॲपवर चुकीची माहिती प्रसारित करण्याने एका जणाला महाग पडले असून त्याच्या विरोधात नंदुरबार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS : प्ले ग्रुपमधील चिमुरड्याला मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शरीरावर असलेल्या बर्थमार्कमुळे कॅन्सर होऊ शकतो का?

Electric Shock : नव्या घरात जाण्याचे स्वप्न अपूर्ण; बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून मृत्यू

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

SCROLL FOR NEXT