Solapur News : सोलापुरातील शेतकऱ्याचा अनोखी शक्कल; १० वर्षांपासून कढीपत्त्याची शेती, वर्षाकाठी 'इतक्या' लाखांची कमाई

Solapur News : वर्षातून तीन वेळा ते या कढीपत्त्याची छाटणी करतात. कढीपत्त्याची लागवड करण्याआधी जमिनीची खत टाकून मशागत करावी लागते.
Solapur News
Solapur NewsSaam tv
Published On

सोलापूर : सोलापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या डोणगाव आहे. या गावातील शेतकरी आनंद शेटे यांनी आपल्या शेतात नवीन प्रयोग करायचं ठरवलं आणि तीन एकरात कढीपत्त्याची लागवड केली. मागच्या सलग १० वर्षापासून ते कढीपत्त्याची शेती करत आहेत. यातून वर्षाला त्यांची लाखोंची कमाई देखील होत आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील डोणगाव येथील आनंद शेटे हे मागील १० वर्षापासुन कढीपत्त्याची शेती करत आहे. वर्षातून तीन वेळा ते या कढीपत्त्याची छाटणी करतात. कढीपत्त्याची लागवड करण्याआधी जमिनीची खत टाकून मशागत करावी लागते. त्यासोबतच ट्रॅक्टरच्या सहाय्याने नंगारनी करुन घ्यावी लागते. कढीपत्त्याची लागवड केल्यानंतर एका वर्षांनी त्याचे उत्पन्न सूरू होते. आठ दिवसाला एकदा या कढीपत्त्यांचे पिकांवर फवारणी करावी लागते. यामध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक या औषधांची फवारणी करावी लागते.

Solapur News
Pune Accident : भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले; पुणे- नगर महामार्गावर भीषण अपघात

वर्षाला चार लाखापर्यंत उत्पन्न 

साधारण तीन एकर बागेत लावलेल्या कढीपत्त्याची छाटणी दर चार महिन्याला (Farmer) शेतकरी आनंद शेटे हे करत आहे. दर छाटणीला या कढीपत्त्यांला वेगवेगळे दर मिळतात. कढीपत्त्यांला कधी ५० रुपये, ४० रुपये, ३५ रुपये तर कधी ५ रुपये किलोप्रमाणे दर मिळतो. त्यामुळे शेटे यांना कढीपत्ताच्या विक्रीतून वर्षाला तीन ते चार लाख रुपयाचे उत्पन्न सहज मिळते. शेतकऱ्यांनी जर कडीपत्त्याची लागवड करावी एकदा कढीपत्ता लावला तर दहा वर्ष त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com