Leopard Attack
Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack: दारातून चिमुकल्‍याला बिबट्याने उचलून नेले; हल्ल्यात बालक ठार

Rajesh Sonwane

अक्कलकुवा (नंदुरबार) : अक्कलकुवा तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून एका बालकावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केला. या हल्ल्यामध्ये देवमोगरा पुनर्वसन गावातील सुरेश भाईदास वसावे (वय ७) याचा मृत्यू झाला. (Breaking Marathi News)

अक्‍कलकुआ तालुक्‍यातील देवमोगरा पुनर्वसन गावात सुरेश वसावे हा दारात जेवण करत असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून शेतात ओढून नेले व लचके तोडले. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या घटनेमुळे अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन गावांवर शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, वनक्षेत्रपाल ललित गवळी, पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत यांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मुलाचा शोध घेतला. घटनेनंतर वन विभागाने जागेवर पंचनामा केला व मृत बालकास शवविच्छेदनासाठी (Akkalkuwa) अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष परमार यांनी शवविच्छेदन केले. घटनेची अक्कलकुवा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. मात्र तीन महिने उलटूनही बिबट्याला पकडण्यात वन विभागाला (Forest Department) अद्यापही यश आलेले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT