Gold And Silver Price: सोने– चांदीची विक्रमी भाववाढ; कोरोनानंतर प्रथमच मोठी वाढ

सोने– चांदीची विक्रमी भाववाढ; कोरोनानंतर प्रथमच मोठी वाढ
Gold And Silver Price
Gold And Silver PriceSaam tv

जळगाव : सोने– चांदीच्‍या दरात आतापर्यंतची विक्रीमी दरवाढ झाली आहे. यामुळे आता सामान्‍यांसाठी (Gold) सोने खरेदी ही आवाक्‍याबाहेर जात असल्‍याचे चित्र पहावयास मिळत आहे. जळगावच्‍या (Jalgaon) सराफ बाजारात बुधवारी (ता. ५) सोन्याच्या दराने (Gold Price) ६२ हजारांचा (प्रतितोळा, जीएसटीसह), तर चांदी ७७ हजार २५० प्रतिकिलोवर गेली आहे. (Maharashtra News)

Gold And Silver Price
Cyber Crime: पार्सलमध्‍ये ड्रग्‍ज सापडले पोलिस पकडतील; भिती दाखवत मुंबई क्राईम ब्रँचच्‍या नावे ९१ लाखात फसवणूक

पंधरा दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ- उतार सुरू आहे. दरम्‍यान ४ एप्रीलचा सोन्याचा प्रतितोळा दर ५९ हजार २०० होता. त्यात ५०० रूपयाची वाढ होऊन दर ६० हजार २०० वर (विनाजीएसटी) गेला. जीएसटीसह सोने ६२ हजार सहा रुपये झाले आहे. तसेच चांदीचे दर प्रतिकिलो ७२ हजार होते. त्यात एकाच दिवसात तीन हजारांची वाढ होत ७५ हजारांवर चांदी (विनाजीएसटी) गेली. जीएसटीसह ती ७७ हजार २५० वर गेली.

Gold And Silver Price
Chatrapati Sambhajinagar: इअरफोन कानात घालून बोलणे बेतले जीवावर; तरूणाचा रेल्वेखाली सापडून मृत्यू

सोने प्रथम ६२ हजारांवर

कोरोनानंतर सोन्या- चांदीच्या दरात प्रथमच एवढी भाववाढ झाली आहे. जीएसटीसह सोने ६२ हजार सहा रुपयांवर पोहचले आहे. सोन्याच्या किंमती वाढण्यामागे अमेरिकेसह इतर देशांतील बँकिंग सेक्टरमधील संकट कारणीभूत आहे. डॉलर कमकुवत झाला आहे. शेअर बाजारात अनिश्चितता आहे. त्याचा फायदा सोन्यासह चांदीत गुंतवणुकीला होत आहे. त्यामुळे सोने वधारले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com