Cyber Crime: पार्सलमध्‍ये ड्रग्‍ज सापडले पोलिस पकडतील; भिती दाखवत मुंबई क्राईम ब्रँचच्‍या नावे ९१ लाखात फसवणूक

पार्सलमध्‍ये ड्रग्‍ज सापडले पोलिस पकडतील; भिती दाखवत मुंबई क्राईम ब्रँचच्‍या नावे ९१ लाखात फसवणूक
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

सचिन जाधव

पुणे : दुबईहून आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहे; असे सांगून एका महिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल ९१ लाखांना गंडा घातला आहे. मुंबई क्राईम ब्रँचमधून (Mumbai crime Branch) बोलत असल्याची बतावणी करून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने सायबर पोलिस (Cyber Police) ठाण्यात फिर्याद दिली. (Live Marathi News)

Cyber Crime
Kalicharan Maharaj On Jitendra Awhad: मी तुकडा टाकल्यावर राजकीय कुत्रे भू भू करतात, कालीचरण महाराजांची टोकाची टीका

फिर्यादी महिलेचे पती हे व्यावसायिक (Cyber Crime) होते. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने आपण एका कुरियरमधून बोलत असून तुमच्या नावाने दुबईहून एक पार्सल आले आहे. त्यात ८०० ग्रॅम ड्रग्ज सापडले आहे. पोलिस तुम्हाला पकडतील; असे सांगून त्यांना अंधेरी येथील सायबर पोलिस अधिकारी याच्याशी संपर्क साधायला सांगितला. त्यांनी त्याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने आम्ही चौकशी करत असून या प्रकरणात तुमचे बँक खाते सील केले जाण्याची शक्यता आहे असे सांगितले.

Cyber Crime
Beed News: जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने संपविली जीवनयात्रा

त्यामुळे तुमच्या बँक खात्यावरील पैसे तुम्ही दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करा, चौकशी पूर्ण झाल्यावर तुम्हाला हे पैसे मिळतील; असे सांगून त्यांना ३ बँक खाते क्रमांक पाठविले. फिर्यादी महिलेने घाबरून आपल्या खात्यातील २० लाख रुपये त्या खात्यांवर ट्रान्सफर केले. त्यानंतर त्यांच्याकडील ८० लाख रुपयांची मुदत ठेवी मोडायला लावून ते पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडले. दरम्यान असा काही प्रकार नसून आपल्याला तोतयानी गंडा घातल्याचे समजताच महिलेने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com