Nandurbar news Saam tv
महाराष्ट्र

Akkalkuwa : बऱ्हाणपूर- अक्कलकुवा बस अडकली चिखलात; भर पावसात प्रवाशांचे हाल

Nandurbar news : पाऊस सुरू असल्यामुळे प्रवाशांना बाहेर निघता येत नव्हते. शहादा आगारातून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली असता बस आल्यानंतर प्रवाशांना रवाना करण्यात आले. तो पर्यंत प्रवाशांना बसमध्येच बसून रहावे लागले

Rajesh Sonwane

सागर निकवाडे  

नंदुरबार : जिल्ह्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून याचा भुर्दंड प्रवाशांना भरावा लागत आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला असून अक्कलकुवा कडे जाणारी प्रवाशांनी भरलेली महामंडळाची बस चिखलात अडकली होती. यामुळे बसमधील प्रवाशांना भर पावसात दुसऱ्या बसची वाट बघत नाहक त्रास सहन करावा लागला आहे. 

राज्य परिवहन महामंडळाची बऱ्हाणपूर- अक्कलकुवा बस ही बऱ्हाणपूरहून शहादा मार्गे अक्कलकुवा जात होती. मात्र शहादा तालुक्यातील होळ उंटावद गावाजवळ पावसाच्या पाण्याने रस्त्यावर चिखल झाला होता. एकेरी मार्ग असल्याने एकच वाहन जाण्यासाठी चांगला रस्ता आहे. यातच बस थोडी रस्त्याच्या खाली उतरविल्याने बस चिखलात अडकली. यामुळे बस मागेही होईना व पुढेही जाईना. बराच वेळ चालकाने बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र बस निघू शकली नाही. 

भर पावसात प्रवाशांचे हाल 

दरम्यान प्रवाशांना बराच काळ बसमध्ये अडकून बसावे लागले. बाहेर पाऊस सुरू असल्यामुळे बाहेर निघता येत नव्हते. बऱ्याच काळानंतर शहादा आगारातून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. हि बस येण्यास देखील बराच वेळ लागला. तोपर्यंत प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. शहादा तालुक्यातील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी; अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

रस्त्यांची बिकट अवस्था 

नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांची दुर्दशा ही नवीन नाही. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांकडून सातत्याने या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Romantic Destinations : जोडीदारासोबतची सहल अविस्मरणीय बनवणारी ८ सुंदर पावसाळी ठिकाणं

US Visa: अमेरिकेचा मोठा निर्णय! व्हिसा शुल्कात १४८ टक्क्यांनी वाढ; पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या खिशाला फटका

Jalgaon Crime News : दारू देण्यास नकार, तरुणांची सटकली; हॉटेल मालकावर अंदाधुंद गोळीबार, जळगावमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

Pune News: गणेशोत्सवाआधी पुण्यातील ढोल-ताशा पथकांना आनंदाची बातमी, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT