अमर घटारे
अमरावती : निसर्गाचा लहरीपणा , वारंवार येणारे अस्मानी संकटामुळे शेतकरी संकटात सापडत असतो. यातून डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड होऊ शकत नसल्याने शेतकरी विवंचनेत टोकाचे पाऊल उचलत असतो. यातूनच पश्चिम विदर्भात दर आठ तासाला शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. अशा प्रकारे मागील सहा महिन्यात तब्बल ५२७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि आकोला या पाच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढतेच आहे. यंदा सहा महिन्यात म्हणजेच जून अखेर ५२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात १७८ आत्महत्या आहे. दर आठ तासात एक शेतकरी मृत्यूचा फास आवळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी बेजार
नैसर्गिक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, बँकांचे व सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अनेक कारणांमुळे पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे. यावर मात करण्यासाठी शासन- प्रशासन गंभीर नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत. अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधित तब्बल ५२७ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
सन २००१ पासून शेतकरी आत्महत्या
अमरावती जिल्हा : ५,४७७
यवतमाळ जिल्हा : ६,३५१
अकोला जिल्हा : ३,२०७
वाशिम जिल्हा : २,१०७
बुलढाणा जिल्हा : ४,५३२
मागील सहा महिन्यातील आत्महत्याची आकडेवारी
अमरावती जिल्हा - १०१
यवतमाळ जिल्हा - १७८
अकोला जिल्हा - ९०
बुलढाणा जिल्हा - ९१
वाशिम जिल्हा - ६७
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.