Nnaudrbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील दोन लाख ८५ हजार कुटुंबांना आनंदाचा शिधा; १५ सप्टेंबरपर्यंत होणार वाटप

Nandurbar News : राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आनंदाचे शिधा देण्याची योजना राबवली जात आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : रेशन कार्ड धारकांना राज्य सरकारकडून सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जात असतो. आता काही दिवसांवर आलेल्या रक्षाबंधन व स्वतंत्र दिनानिमित्ताने शिधा वाटप केला जाणार असून नंदुरबार जिल्ह्यातील दोन लाख ८४ हजार ९६० कुटुंबाना हा शिधा मिळणार आहे. 

राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आनंदाचे शिधा देण्याची योजना राबवली जात आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या आत (Nnaudrbar News) नंदुरबार जिल्ह्यातील दोन लाख ८४ हजार ९६० कुटुंबांसाठी आनंदाचे शिधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कुटुंबांना सणाच्या वेळेस या किटमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो सोयाबीन तेल व एक किलो चणाडाळ या वस्तूंच्या पाकीट मिळणार आहे.

१५ सप्टेंबरपर्यंत वाटप 

नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थी असलेल्या दोन लाख ८४ हजार ९६० कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. अंत्योदय आणि प्राधान्यक्रम (Ration Card) रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत रेशन दुकानावर हे आनंदाचा शिधा किट उपलब्ध होणार आहे. यानंतर याच्या वाटपास सुरवात होऊन लाभार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत सर्व कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court : पतीच्या निधनानंतर वयोमर्यादा उलटून गेली तरी पत्नीला मिळणार नोकरी, हाय कोर्टाचा निर्णय काय ? वाचा

Bihar Election Result Live Updates : तेजस्वी यादव १२ हजार मतांनी आघाडीवर

Palak Bhaji Recipe: चहासोबत रोज कांदे पोहे कशाला? थंडीत करा गरमागरम पालक भजीचा बेत, नोट करा रेसिपी

Maharashtra Live News Update: जैन बोर्डिंग व्यवहारातील सेल डीड कायदेशीररित्या रद्द करण्यास परवानगी

South Indian Food: साऊथ इंडियन पदार्थ एवढे फेमस का आहेत? वाचा कारणे

SCROLL FOR NEXT