Akkalkuwa News  Saam tv
महाराष्ट्र

Akkalkuwa : पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; संस्था चालकांचा बेजाबदारपणा, ७० विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून २०० किलोमीटरचा प्रवास

Nandurbar News : अक्कलकुवा तालुक्यामधील दुर्गम भागातून चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक शाळेत प्रवेशित असलेले ७० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अक्कलकुवा येथे घेण्यासाठी आले होते

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : शाळेचा पहिला दिवस म्हटला कि मुलांची चांगला तयारी करून शाळेत पाठविले जाते. तर प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुले टाकून तसेच शाळेच्या भिंतींवर फुगे लावण्यात येत असतात. मात्र अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना अगदी गुराढोरांप्रमाणे ट्रकमध्ये कोंबून शाळेत नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अर्थात पहिल्याच दिवशी या मुलांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे समोर आले आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यामधील दुर्गम भागातून चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील अनुदानित आश्रम शाळेतील काही शिक्षक हे शाळेत प्रवेशित असलेले ७० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अक्कलकुवा येथे घेण्यासाठी आले होते. त्यासाठी त्यांनी देवळी येथून मालवाहू वाहन अक्कलकुवा येथे आणले होते. सदर संस्थेने सहा ते ८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता विद्यार्थ्यांना वाहनात कोंबून बसवले. विशेष म्हणजे या बालकांमध्ये निम्म्याहून जास्त मुलींचा समावेश होता. 

२०० किमीचा प्रवास 

अक्कलकुवा येथुन देवळी या गावाचे अंतर सुमारे २०० किलोमीटर पेक्षा अधिक असतांना देखील सदर संस्थेने मुलांना बस, चारचाकी वाहनातून न नेता माल वाहतूक करणाऱ्या वाहनांतून नेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे दुपारी २ वाजेपर्यंत संस्थेने मुलांना ना नास्ता, ना जेवण दिले होते. त्यामुळे मुलांचा चेहरा निस्तेज पडला होता. तर मुलींना नेतांना त्यांची काळजी घेण्यासाठी त्यात कोणतीही महिला कर्मचारी नव्हती. त्यामुळे शाळकरी लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर होता.

कारवाईची मागणी 

अक्कलकुवा येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात सदर वाहनात मुलांना बसवतांना काही सामाजिक कार्यकर्त्यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी संबंधित शिक्षकांना जाब विचारत मुलांना बसमध्ये नेण्यास सांगितले. त्यानुसार शिक्षकांनी होकार दिला. मात्र बसमधुन केवळ २७ मुलांना नेण्यात आल्याचे समजले. तर उर्वरित मुले ही ट्रकमधून नेण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अशा प्रकारामुळे संस्था चालकावर व संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात यावी; अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hema Malini: ड्रीम गर्ल ते बसंती...; हेमा मालिनीच्या 'या' भुरळ पाडणाऱ्या खास भूमिका

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे बैठकीला थेट दुचाकीवरून पोहचल्या

Truck Accident: भीषण अपघात; बोगद्याजवळ ट्रक उलटला,एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान

सॉरी मम्मी - पप्पा! १०वीच्या विद्यार्थिनीनं किचनमध्ये आयुष्याचा दोर कापला, सुसाईड नोटमधून सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT